शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

आष्टीची नरभूमी आजही दुर्लक्षित, आष्टीच्या लढाईला २०० वर्षे पूर्ण, आष्टीकर जोपासताहेत खुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 13:01 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे त्यांच्या मृत्यूनंतरही रक्षण करण्यासाठी अनेक शूर मावळे, सेनापती यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. इंग्रज व मराठे यांच्यात मोहोळ तालुक्यातील आष्टीत लढाई झाली.

ठळक मुद्देइंग्रज व मराठे यांच्यात मोहोळ तालुक्यातील आष्टीत लढाई२० फेब्रुवारी १८१८ रोजी झालेल्या या लढाईला २०० वर्षे पूर्ण१६ नोव्हेंबर १८१७ च्या येरवडा येथील लढाईत  निष्क्रिय व उदासीन श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवा यांचा पराभव झाला होता

महेश कोटीवालेआॅनलाइन लोकमत सोलापूरवडवळ दि २० : छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे त्यांच्या मृत्यूनंतरही रक्षण करण्यासाठी अनेक शूर मावळे, सेनापती यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. इंग्रज व मराठे यांच्यात मोहोळ तालुक्यातील आष्टीत लढाई झाली. ही लढाई अजरामर करणाºया नरवीर बापू गोखले यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. २० फेब्रुवारी १८१८ रोजी झालेल्या या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाली. आज या लढाईतील खुणा आष्टीकर ग्रामस्थ जोपासताना दिसतात; मात्र आष्टीची ही नरभूमी आजही दुर्लक्षित आहे.   अनेक इतिहासकार व संशोधकांनी आष्टीच्या लढाईचे वर्णन केले आहे. १६ नोव्हेंबर १८१७ च्या येरवडा येथील लढाईत  निष्क्रिय व उदासीन श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवा यांचा पराभव झाला होता. तेथून त्यांचे पलायन सुरु होते; मात्र राजा खचला तरी त्यांचे सैन्य व सेनापती मात्र खचले नव्हते. मूठभर सैन्य घेऊन नरवीर बापू गोखले त्यांच्या सोबत होते. या सैन्याचा तळ मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे पडल्यानंतर इंग्रज सैन्य जनरल स्मिथ येथे धडकले. प्रसंग बाका होता. पेशवे अजूनही संभ्रमात व गोंधळलेले होते; मात्र नरवीर बापू गोखले यांनी पेशव्यांना मी एकटाच इंग्रजांना सामोरे जाणार असून, लढताना मरण आले तर बहुमान, याउपर श्रीमंतांचे दर्शन झाले तर उत्तम; अन्यथा हे अंतिम दर्शन असे सांगून जनरल स्मिथच्या सैन्याशी मूठभर मराठे प्राणाची बाजी लावून लढले. घनघोर लढाई झाली. यात नरवीर बापू गोखले धारातीर्थी पडले.  त्यांच्यासोबत गोविंदराव घोरपडे, बहिरजी शितोळे, बाबर आदी मोहरे देखील गळून पडले.आष्टी हे गाव पंढरपूरपासून २२ कि. मी. अंतरावर आहे. कैकाड्याची,बापू गोखल्यांची आष्टी या नावाने परिचित आहे. धूर्त इंग्रजांनी या लढाईनंतर येथील भूमीस महत्त्व प्राप्त होऊ नये व ऐतिहासिक महत्त्व कमी व्हावे म्हणून १८८८ मध्ये मोठे तळे खोदले. ही युद्धभूमी ओळखू येऊ नये याची काळजी घेतली. याच भूमीवर नरवीर बापू गोखले यांची समाधी होती का नाही याबाबत  निश्चित पुरावा अजून मिळाला नसला तरी येथे युद्ध संबंधी अनेक तलवारी, शस्त्रे यापूर्वी  सापडली असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.--------------------------नरवीर बापू गोखलेंवर पुस्तक- आष्टी येथील बुजुर्ग व अभ्यासू मंडळींनी येथील खुणा जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि करताहेत. नूतन विद्यालय येथील उपक्रमशील शिक्षक व लेखक  संजय पाटील यांनी स्वत: संशोधन करून ‘अजरामर योद्धा: नरवीर बापू गोखले’ हे पुस्तक लिहिले आहे.  देवानंद पाटील, मदनसिंह पाटील, बाळासाहेब पाटील,राजाबापू  पाटील,खासेराव पाटील, शंकर माने,महादेव व्यवहारे, शाम कांबळे, वसुदेव व्यवहारे,सरपंच शैलेंद्र पाटील,  पं. स. सदस्य डॉ. प्रतिभा व्यवहारे,भीमराव पाटील,सज्जनराव पाटील, भजनदास व्यवहारे,काकासाहेब पाटील,संजय क्षीरसागर, जे. के. गुंड, विजय गुंड, तुकाराम माने, विलास पाटील आदी ग्रामस्थांनी विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित करुन या स्मृति तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न केला आहे. आज गावात नूतन विद्यालयाचे नरवीर वसतिगृह, नरवीर तरुण मंडळ, नरवीर वाचनालय, नरवीर व्याख्यानमाला, नरवीर क्रीडा मंडळ  सुरु आहे. इतकेच नाही तर येथे बँक आॅफ इंडिया शाखा-नरवीर बापू गोखले आष्टी असे नाव आहे.-----------------आष्टीची लढाईनरवीर बापू गोखले आणि इंग्रज यांच्यात आष्टीत येथे झालेल्या लढाईच्या ठिकाणी इंग्रजांनी इ. स. १८८८ साली खोदलेले तळे. 

टॅग्स :Solapurसोलापूर