शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

By आप्पासाहेब पाटील | Updated: July 6, 2025 01:54 IST

आषाढी महापूजेसाठी कैलास दामू उगले (वय ५२) व कल्पना कैलास उगले (वय ४८) रा. जातेगांव, ता. नांदगांव, जि. नाशिक यांना मान मिळाला आहे. या दाम्पत्यांचा कैलास उगले यांचे वडील माजी सैनिक होते.

आप्पासाहेब पाटील -

सोलापूर : आषाढी एकादशीचा सोहळा आज होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय पूजा होणार आहे. या शासकीय पूजेवेळी मानाचे वारकरी म्हणून नाशिकच्या दाम्पत्यांना मान मिळाला आहे.

आषाढी महापूजेसाठी कैलास दामू उगले (वय ५२) व कल्पना कैलास उगले (वय ४८) रा. जातेगांव, ता. नांदगांव, जि. नाशिक यांना मान मिळाला आहे. या दाम्पत्यांचा कैलास उगले यांचे वडील माजी सैनिक होते.

 आषाढीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात १५ लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. विठ्ठलाचे दर्शनाची रांग पाच किलोमीटर पर्यंत पोहोचली आहे. चंद्रभागेच्या तीरावर स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान -पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून बाळू शंकर अहिरे ( वय ५५) व आशाबाई बाळू अहिरे ( वय ५०, रा. अंबासन, ता. सटाणा, जिल्हा नाशिक) या दापत्याची मागील वर्षी 2024 मध्ये निवड करण्यात आली होती. आता सलग दुसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील वारकरी दांपत्याला हा मान मिळाला आहे. तर 2023 मध्येही कार्तिकी एकादशीला  एकादशीच्या महापूजेचा मान नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बबनराव घुगे आणि वत्सला घुगे या दांपत्याला मिळाला होता.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५PandharpurपंढरपूरNashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री