आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
By आप्पासाहेब पाटील | Updated: July 6, 2025 01:54 IST2025-07-06T01:54:14+5:302025-07-06T01:54:22+5:30
आषाढी महापूजेसाठी कैलास दामू उगले (वय ५२) व कल्पना कैलास उगले (वय ४८) रा. जातेगांव, ता. नांदगांव, जि. नाशिक यांना मान मिळाला आहे. या दाम्पत्यांचा कैलास उगले यांचे वडील माजी सैनिक होते.

आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
आप्पासाहेब पाटील -
सोलापूर : आषाढी एकादशीचा सोहळा आज होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय पूजा होणार आहे. या शासकीय पूजेवेळी मानाचे वारकरी म्हणून नाशिकच्या दाम्पत्यांना मान मिळाला आहे.
आषाढी महापूजेसाठी कैलास दामू उगले (वय ५२) व कल्पना कैलास उगले (वय ४८) रा. जातेगांव, ता. नांदगांव, जि. नाशिक यांना मान मिळाला आहे. या दाम्पत्यांचा कैलास उगले यांचे वडील माजी सैनिक होते.
आषाढीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात १५ लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. विठ्ठलाचे दर्शनाची रांग पाच किलोमीटर पर्यंत पोहोचली आहे. चंद्रभागेच्या तीरावर स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान -
पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून बाळू शंकर अहिरे ( वय ५५) व आशाबाई बाळू अहिरे ( वय ५०, रा. अंबासन, ता. सटाणा, जिल्हा नाशिक) या दापत्याची मागील वर्षी 2024 मध्ये निवड करण्यात आली होती. आता सलग दुसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील वारकरी दांपत्याला हा मान मिळाला आहे. तर 2023 मध्येही कार्तिकी एकादशीला एकादशीच्या महापूजेचा मान नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बबनराव घुगे आणि वत्सला घुगे या दांपत्याला मिळाला होता.