शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

शिवाजी नगरातील आशा वर्करचे घर फोडले; पावणे दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 4:32 PM

कॉरंटाईन झालेल्या कुटुंबियांचे घर फोडले; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देयाप्रकरणी सुनिल मुरलीधर सुरवसे (वय-५५) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीअज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस उपनिरीक्षक देशमाने करीत आहेतआशा वर्करच्या पतीने घरी येऊन पाहणी केली असता आतील कपाटामध्ये ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास

सोलापूर: कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने संपूर्ण कुटुंबिय कॉरंटाईन झाल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यानेसोलापूर महानगरपालिकेतील आशा वर्करचे घर फोडून पावणेदोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही चोरी २७ जून रोजी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. 

सोलापूर महानगरपालिकेत आशा वर्करला कोरोनाची बाधा झाली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आशा वर्करसह त्यांच्या घरातील सर्व सदस्यांना केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉरंटाईन करण्यात आले होते़ घरातील सर्व सदस्य कॉरंटाईन झाल्यामुळे शिवाजीनगर येथील घराला २३ जून  रोजी कुलुप लावण्यात आले होते.

चोरट्याने या संधीचा फायदा घेत, बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील १ लाख ७८ हजार पाचशे रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ २७ जून रोजी शेजाºयांना घराचे कुलूप तुटून पडल्याचे निदर्शनात आले. शेजाºयांनी तात्काळ याची माहिती आशा वर्करच्या पतीला फोनवरून दिली. आशा वर्करच्या पतीने घरी येऊन पाहणी केली असता आतील कपाटामध्ये ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी सुनिल मुरलीधर सुरवसे (वय-५५) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस उपनिरीक्षक देशमाने करीत आहेत. -चोरीला गेलेले दागिने...- कपाटात पंचवीस हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, दहा हजार रुपये किमतीचे झुबे, ६० हजार रुपये किमतीची अंगठी, ४६ हजार रुपये किमतीच्या अंगठ्या, पंचवीस हजार रुपये किमतीचे लॉकेट, चांदीचे पैंजण, अंगठी, जोडव्या, चांदीची वाटी, फुलपात्र, चमचा असा एकूण १ लाख ७८ हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याThiefचोरPoliceपोलिस