शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

आंबेडकरांच्या वारसांनी सर्वसमावेशक धोरणाला काळीमा फासला : सुशीलकुमार शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:37 AM

मुस्लीम कट्टरतवाद्यांसोबत जाऊन आंबेडकरांनी चुकीचा संदेश दिला अशी टीका काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केली. 

ठळक मुद्देजाती आणि धर्माच्या नावावर मते मागितली जात आहेत - सुशीलकुमार शिंदे ‘एमआयएम’ कोणत्या पध्दतीने काम करते हे तुम्हाला माहीत असेलच - सुशीलकुमार शिंदे मुस्लीम कट्टरतवाद्यांसोबत जाऊन आंबेडकरांनी चुकीचा संदेश दिला - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदारांनी मुस्लीम कट्टरतावाद्यांसोबत जाण्याची भूमिका घेतली. देशातील सर्वसमावेशक धोरणाला काळीमा फासला, अशी टीका काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केली. 

 बाळीवेस येथील बसव केंद्रात मेळाव्याचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते. लिंगायत धर्मगुरू बसवलिंग महास्वामी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, लिंगायत समन्वय समितीचे प्रमुख विजयकुमार हत्तुरे, रेवणसिध्द आवजे, बसव केंद्राचे प्रमुख शिवशंकर काडादी, मोहोळचे नागेश बिराजदार, अमर सगरे, मंगळवेढ्याचे मल्लू बिराजदार, संगमेश्वर चौगुले, उत्तर सोलापूरचे दत्ता इरपे, अमित रोडगे, प्रा. राजू प्याटी, केदार म्हमाणे, नागनाथ मेंगाणे, दयानंद शिवयोगी, बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे आदी उपस्थित होते. 

शिंदे म्हणाले, बसवेश्वर महाराजांनी सर्वसमावेशक धर्माची स्थापना केली. पण आता इथे जाती आणि धर्माच्या नावावर मते मागितली जात आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी तर ‘एमआयएम’सोबत युती करण्याचा निर्णय घेतला. ‘एमआयएम’ कोणत्या पध्दतीने काम करते हे तुम्हाला माहीत असेलच. दुसरीकडे माकपच्या लोकांनी वंचित आघाडीसोबत युती केली आहे. माकपचे लोक तर देव-धर्म मानत नाहीत. देवाला दगड मानतात. हे लोक केवळ काँग्रेसच्या मतविभाजनासाठी उभे आहेत. मुस्लीम कट्टरतवाद्यांसोबत जाऊन आंबेडकरांनी चुकीचा संदेश दिला आहे, असेही शिंदे यांनी सांगितले. 

बसवलिंग महास्वामी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांना नोकरी करण्याऐवजी पकोडे तळायला सांगतात. गंगा नदीला शुध्द करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च केले. प्रत्यक्षात गंगा नदी स्वच्छ झाली नाही. मोदींचा आत्मा शुध्द नाही. तो असता तर गंगा शुध्द झाली असती. ‘जीएसटी’मुळे व्यापारी हैराण झाले आहेत. नोटाबंदीनंतर नव्या नोटा छापायला २८ हजार कोटी रुपये खर्च झाले. एवढा पैसा शेतकºयांसाठी खर्च करता आला असता. पण एका अजाणत्या माणसाने हा निर्णय घेऊन देशाचे नुकसान केले, अशी टीकाही  महास्वामी यांनी केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर