आधीच महापूर त्यात सकाळपासून पुन्हा जाेरदार पाऊस; रेड अलर्टच्या इशाऱ्याने सोलापूरकरांना नुकसानीची चिंता
By आप्पासाहेब पाटील | Updated: September 26, 2025 14:38 IST2025-09-26T14:38:05+5:302025-09-26T14:38:32+5:30
शुक्रवारी सकाळपासून सुर्यदर्शन झाले नाही. सकाळी ७ वाजल्यापासूनच पावसाने जोर धरला आहे. सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागात पाऊस जोरदार बरसत आहे.

आधीच महापूर त्यात सकाळपासून पुन्हा जाेरदार पाऊस; रेड अलर्टच्या इशाऱ्याने सोलापूरकरांना नुकसानीची चिंता
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : आधीच सीना व भीमा नदीला आलेल्या महापूरानं सोलापूर जिल्ह्यातील १२९ गावांना पाण्यानं वेढा घातलेला असताना शुक्रवारी सकाळपासून पुन्हा पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान, उद्या शनिवार व परवा रविवार या दोन दिवसात पुन्हा हवामान खात्यानं रेड अलर्ट चा इशारा दिल्यानं सोलापूरकरांना पुन्हा नुकसानीची चिंता लागली आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळपासून सुर्यदर्शन झाले नाही. सकाळी ७ वाजल्यापासूनच पावसाने जोर धरला आहे. सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागात पाऊस जोरदार बरसत आहे. या पावसामुळे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर, करमाळा, माढा, बार्शीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर-पुणे महामार्ग सुरू करण्यात आला असून सोलापूर-विजयपूर महामार्ग बंदच ठेवण्यात आला आहे.
मागील २४ तासात सोलापुरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा नद्या, तलाव, ओढे तुडूंब वाहत आहेत. जिल्ह्यातील सहा तालुक्यांना पुराचा फटका बसला आहे. १२९ गावे पाण्याने वेढली आहेत. एनडीआरएफ व लष्कराच्या विमानानं मदतीचे काम वेगाने सुरू आहे.