अक्कलकोटचे मुख्याधिकारी निलंबित

By Admin | Updated: May 6, 2014 17:35 IST2014-05-05T22:55:14+5:302014-05-06T17:35:42+5:30

सोलापूर: दीर्घकाळ विनापरवाना गैरहजर असलेले अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना नगरविकास खात्याने निलंबित केले आहे.

Akkalkot's Chief Officer Suspended | अक्कलकोटचे मुख्याधिकारी निलंबित

अक्कलकोटचे मुख्याधिकारी निलंबित

सोलापूर: दीर्घकाळ विनापरवाना गैरहजर असलेले अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना नगरविकास खात्याने निलंबित केले आहे.
नवे मुख्याधिकारी म्हणून एन.के. पाटील हे रुजू झाले आहेत. कोळेकर हे एप्रिल २०१३ पासून विना परवाना गैरहजर होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी रुजू होण्याबाबत नोटीसा दिल्यानंतरही ते रुजू झाले नाहीत. कोळेकर यांच्यावरील कारवाईचा अहवाल शासनाकडे गेल्यानंतर त्यांनी रजेचा अर्ज दिला. मात्र तो ग्रा‘ धरण्यात आला नाही. दरम्यान शासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Web Title: Akkalkot's Chief Officer Suspended