शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

पुण्यानंतर लातूर, सांगली, पिंपळगाव बाजार समित्या उलाढालीत अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 11:35 AM

सोलापूर सातव्या क्रमांकावर : गतवर्षात १३६६ कोटी रुपयांचा टर्नओव्हर

ठळक मुद्देबाजार समितीत दररोज होणाऱ्या खरेदी-विक्रीवर उलाढाल अवलंबून असतेलोकसंख्येत मोठ्या शहरात बाजार समितीची उलाढाल मोठी होतेपुणे शहराची लोकसंख्या मोठी असल्याने बाजार समितीची उलाढालही सर्वाधिक

सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढालात राज्यात सर्वाधिक असून लातूर दुसऱ्या, सांगली तिसऱ्या तर पिंपळगाव पिंपळगाव बसवंत ( नाशिक) चौथ्या क्रमांकावर आहे. सोलापूरबाजार समिती सातव्या क्रमांकावर गेली आहे.

बाजार समितीत दररोज होणाऱ्या खरेदी-विक्रीवर उलाढाल अवलंबून असते. त्यातही लोकसंख्येत मोठ्या शहरात बाजार समितीची उलाढाल मोठी होते. मात्र विश्वासार्हता निर्माण झालेल्या बाजार समित्या लहान असल्या तरी मोठी उलाढाल होतेच. पुणे शहराची लोकसंख्या मोठी असल्याने बाजार समितीची उलाढालही सर्वाधिक असणे साहजिकच आहे. पुणे शहरातील बाजार समितीची २०१९-२० ची उलाढाल चार हजार २३१ कोटी इतकी झाली होती. त्यानंतर लोकसंख्येत मोठे शहर नसलेल्या लातूरची वार्षिक उलाढाल १९१४ कोटी, सांगली बाजार समितीची उलाढाल १८८० कोटी, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीची उलाढाल १५८० कोटी, लासलगाव बाजार समितीची १४१२ कोटी, तर सातव्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर बाजार समितीची उलाढाल १३६६ कोटी इतकी झाली होती.

हिंगणघाट बाजार समिती ११०६ कोटी, अमरावती बाजार समिती ९७३ कोटी, खामगाव बाजार समिती ९६८ कोटी, अहमदनगर बाजार समिती ९२५ कोटी, नाशिक ९२४ कोटी रुपये इतकी उलाढाल झाली आहे. बेदाणा विक्रीसाठी नावाजलेल्या तासगाव बाजार समितीत ८६१ कोटी, उदगीर ८२९ कोटी, कोल्हापूर ७६८ कोटी, जुन्नर ७५४ कोटी, मालेगाव ६३८ कोटी, जालना ६१४ कोटी, मलकापूर ५८७ कोटी, तर धामणगाव रेल्वे ५६८ उलाढाल करून २० व्या क्रमांकावर आहे.

राज्यातील ३०६ समित्या ‘अ’ दर्जाच्या

  • - राज्यातील ३०६ बाजार समित्यामध्ये ‘अ’ दर्जाच्या आहेत. १५९, ‘ब’ दर्जाच्या, ६६ क दर्जाच्या, तर ३५ ‘ड’ दर्जाच्या ४६ बाजार समित्यांचा समावेश आहे.
  • - राज्यातील बाजार समित्याकडून ५६ कोटी ४४ लाख रुपये अंशदानाची रक्कम पणन मंडळाकडे जमा होणे अपेक्षित आहे; पण जानेवारीअखेर २० कोटी २२ लाख रुपये वसूल झाला, तर ३६ कोटी २२ लाख थकबाकी आहे.
  • - सोलापूर बाजार समिती उलाढालीत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे बाजार समितीत सातत्याने सांगितले जाते मात्र २०१९-२० मध्ये सोलापूर सातव्या क्रमांकावर गेली आहे.
टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारPuneपुणेlaturलातूरSangliसांगली