पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात हयगय केल्यास होणार कारवाई - सुनील पावडे

By appasaheb.patil | Published: June 11, 2019 01:22 PM2019-06-11T13:22:43+5:302019-06-11T13:26:40+5:30

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणची काय यंत्रणा आहे याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे याच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.

Action will be taken after the hike in power supply during the monsoon - Sunil Pawde | पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात हयगय केल्यास होणार कारवाई - सुनील पावडे

पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात हयगय केल्यास होणार कारवाई - सुनील पावडे

Next
ठळक मुद्दे पावसाळ्यात गंभीर बिघाड होऊन वीजप्रवाह बंद पडल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत - वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याच्या कामात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश

सोलापूर : पावसामुळे वीजयंत्रणेत मोठ्या प्रमाणात बिघाड होत असतो़ तत्पूर्वी संभाव्य बिघाड टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यात गंभीर बिघाड होऊन वीजप्रवाह बंद पडल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत़ वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याच्या कामात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना दिल्याची माहिती बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

पावसाळ्यात अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर, पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. अशातच जोरदार पावसामुळे वीज यंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा बंद होण्याचे प्रमाण वाढत असते़ तत्पूर्वी अशा घटनांवर आळा घालण्यासाठी महावितरणकडून काय काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत व नागरिकांनी या काळात काय काळजी घ्यावी याबाबत बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.

प्रश्न : पावसाळ्यात विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होतो़ तो होऊ नये यासाठी महावितरणची यंत्रणा काय काय करणार आहे ?
उत्तर : अतिवृष्टी, वादळी वाºयासह पडणाºया पावसामुळे विजेच्या तारा, वीजखांब पडण्याचे प्रमाण वाढते़ त्यामुळे त्या त्या भागातील वीजपुरवठा खंडित होत असतो़ वीजपुरवठा खंडित झाल्यास त्वरित वीजप्रवाह सुरू करण्यासाठी महावितरणची विशेष टीम कार्यरत असणार आहे.

प्रश्न : तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास आपली काय यंत्रणा आहे ?
उत्तर : वादळ तसेच पावसामुळे अथवा इतर तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दुरुस्ती काम करून घेण्यासाठी संंबंधित अभियंत्यांची टीम काम करणार आहे़ दरम्यान, काम करण्यास वेळ लागत असल्यास आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करावा, असे निर्देश दिले आहेत.

प्रश्न : एखाद्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला तर तो कधी सुरू होणार आहे, किती वेळ लागणार आहे याबाबत वीजग्राहकांना काहीच माहीत नसते त्याबद्दल काय सांगाल ?
उत्तर : जर एखाद्या भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास तर संबंधित त्या भागातील अभियंत्यांनी त्याबाबतची माहिती संबंधित वीजग्राहकांना द्यावी़ शिवाय वीजग्राहकांसाठी महावितरणचे कॉल सेंटर २४ तास उपलब्ध असणार आहे त्यावरही ग्राहक तक्रार अथवा माहिती घेण्याची सोय उपलब्ध असणार आहे.

प्रश्न : पावसाळ्यात वीजग्राहकांनी काय काय काळजी घ्यावी?
उत्तर : अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी़ तुटलेल्या, लोंबकळणाºया वीजतारांपासून सावध राहावे, पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, विशेषत: पत्र्याच्या घरात राहणाºया नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

Web Title: Action will be taken after the hike in power supply during the monsoon - Sunil Pawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.