शांतात भंग करणाऱ्या सात जणांवर तडीपारीची कारवाई

By दिपक दुपारगुडे | Published: January 7, 2024 06:30 PM2024-01-07T18:30:16+5:302024-01-07T18:30:23+5:30

सदर कारवाईमध्ये अक्कलकोट तालुक्यातील सहा तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक जणांचे समावेश आहे.

Action taken against seven people for breach of peace | शांतात भंग करणाऱ्या सात जणांवर तडीपारीची कारवाई

शांतात भंग करणाऱ्या सात जणांवर तडीपारीची कारवाई

सोलापूर : अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात सामाजिक शांतता भंग करणारे तब्बल सात जणांवर दोन जिल्ह्यासाठी हद्दपारची कारवाई केली आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी क्रमांक २ चे प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी केली आहे.

सदर कारवाईमध्ये अक्कलकोट तालुक्यातील सहा तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक जणांचे समावेश आहे. सदर गुन्हेगार हे सातत्याने सामाजिक शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांना आळा बसावा म्हणून संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिसांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यावर पुरेशा कागदोपत्र तपासून, आजपर्यंत किती व कोणकोणत्यात्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. याची पूर्णपणे माहिती घेऊन ही कारवाई केली आहे. दोन जिल्ह्यातून यांना हद्दपार करण्यात आले असून सर्वांना दोन जिल्हे बाहेर पोलिसांनी सोडून आले आहेत. या आदेशाचे अंमलबजावणी तात्काळ करण्याचे सूचना पोलिसांना देण्यात आले आहे.

यांच्यावर झाली कारवाई संतोष विजापुरे, अजित विजापुरे, प्रमोद मंगरुळे (सर्व रा. गुड्डेवाडी, ता. अक्कलकोट) शाकिर मूर्तज पटेल, नासीर मुर्तुज पटेल (दोघे रा. चपळगाव), ऋतिक सूर्यकांत साळे (रा. भीमनगर अक्कलकोट), मल्लिकार्जुन अप्पासाहेब म्हेत्रे (रा. टाकळी, ता. दक्षिण सोलापूर) असे सात जणांवर सोलापूर, उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांतून हद्दपारची कारवाई पुढील दोन वर्षांसाठी करण्याचे आदेश आहेत.

Web Title: Action taken against seven people for breach of peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.