विजापूर वेस येथे हाणामारी

By Admin | Updated: May 17, 2014 23:58 IST2014-05-17T23:58:43+5:302014-05-17T23:58:43+5:30

दोन्ही गटाच्या १६ जणांविरुद्ध गुन्हा

Action at Bijapur Wear | विजापूर वेस येथे हाणामारी

विजापूर वेस येथे हाणामारी

सोलापूर : विजापूर वेस हाणामारीप्रकरणी दोन्ही गटाच्या १६ जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फय्याज कुरेशी (रा. शुक्रवारपेठ) याने दिलेल्या फिर्यादीवरून शमकार तुळजापुरे, असीम तुळजापुरे, इम्रान मोहोळकर (रा. शनिवारपेठ), ख्वाजा लोकपल्ली, अली लोकपल्ली, एजाज लोकपल्ली, रियाज लोकपल्ली (रा. सोमवारपेठ), मौला तुळजापुरे (रा. बेगमपेठ) यांच्याविरुद्ध बेकायदा जमाव जमवून चाकू व बांबूने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ मे रोजी सायंकाळी पाच वाजता विजापूर वेशीतील दरबार हॉटेलसमोर फय्याज हा चहा पित थांबलेला असताना त्याच्या मामाचा मुलगा वसीम कुरेशी याच्या मोटरसायकलचा धक्का लागल्यावरून आरोपींनी हल्ला केला. ख्वाजा लोकपल्ली (भीमनगर समाज मंदिराजवळ) याने दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून जुबेर कुरेशी (सोमवारपेठ), सोहेल अब्दुल कुरेशी (शनिवारपेठ), फय्याज जमील कुरेशी (शुक्रवारपेठ), अफान इस्माईल कुरेशी (बाराइमाम चौक), शकील कुरेशी (शुक्रवारपेठ), मौला तुळजापुरे व इतर ८ अनोळखी लोकांविरुद्ध मारहाण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ख्वाजा हा हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेला असताना इप्तेकार तुळजापुरे याच्याबरोबर का फिरतोस म्हणून आरोपींनी मारहाण केली. जुबेर कुरेशी याने काठीने डोक्यात मारले व दीड तोळ्याची सोनसाखळी, पाच तोळ्याचा चांदीचा कडा आणि ८ हजारांची रोकड चोरून नेली. 

Web Title: Action at Bijapur Wear