Breaking; पेट्रोलिंग करणाऱ्या बार्शीतील दोन पोलिसांवर आरोपीचा प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 11:47 AM2020-10-08T11:47:03+5:302020-10-08T11:47:33+5:30

पोलीस कर्मचारी जखमी; एक आरोपी अटक, दोघे फरार

Accused assaulted two policemen on patrol in Barshi | Breaking; पेट्रोलिंग करणाऱ्या बार्शीतील दोन पोलिसांवर आरोपीचा प्राणघातक हल्ला

Breaking; पेट्रोलिंग करणाऱ्या बार्शीतील दोन पोलिसांवर आरोपीचा प्राणघातक हल्ला

Next

बार्शी : बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस  रात्रीच्यावेळी पेट्रोलिंग करत असताना बार्शी तालुक्यातील काटेगावजवळ एक दुचाकी वेगाने पुढे जात असताना तिचा पाठलाग करत असताना एका आरोपीस पकडताच त्याने जवळच्या हत्याराने दोन पोलिसांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे.
ही घटना काटेगाव जवळील रानवारा हॉटेलजवळ गुरुवारी पहाटे 4 च्या सुमरास होऊन यात पोलीसांनी सडकेल भोसले (रा .कुर्डुवाडी) या आरोपीचा पाठलाग करून त्यास अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपी पळून  जाऊ लागल्याने त्याचा पाठलाग करणारे पोलीस योगेश मंडलिक व बळीराम बेदरे यांच्या हातावर सुरा मारून हाताला चावा व डोळ्याचे खाली व छातीवर दगडाने मारहाण करन जखमी केल्याची घटना होऊन असून त्यांच्यावर दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले.
   याबाबत जखमी पोलीस योगेश मंडलिक यांनी पोलिसात गुरुवारी सकाळी तक्रार देताच पोलिसांनी सदकेल सुरचंद भोसले उर्फ शिवा गंगाराम भोसले (30 रा.परांडा  रोड ता.माढा) व इतर दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  पोलिसांवर झालेल्या हल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक अभिजित धारशिवकर व सपोनि शिवाजी जायपत्रे यांना समजताच घटनास्थळी जाऊन पहाणी केली.
  यात अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चोवरून आणलेल्या चार इरकल साड्या एक सोन्याचे मंगळसूत्र,  सोन्याची चैन, कानातील रिंग, धोतर फेटे, सुरे, कात्री, ब्लेड व एक दुचाकी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.

Web Title: Accused assaulted two policemen on patrol in Barshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app