तुळजापूरच्या घाटात अपघात; सोलापूरचे सात जण जागीच ठार

By appasaheb.patil | Published: February 18, 2019 08:26 PM2019-02-18T20:26:23+5:302019-02-18T20:32:33+5:30

सोलापूर : सोलापूरहून तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापूरच्या सात भाविकांचा अपघाती मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती तुळजापूर पोलिसांनी दिली़ यात ...

Accidents in Tuljapur Ghat, Solapur killed seven people on the spot | तुळजापूरच्या घाटात अपघात; सोलापूरचे सात जण जागीच ठार

तुळजापूरच्या घाटात अपघात; सोलापूरचे सात जण जागीच ठार

Next
ठळक मुद्दे- अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू तर चार जण जखमी- अपघातानंतर मार्गावरील वाहतूक झाली ठप्प- घटनास्थळी पोलीस दाखल, पंचनामा करण्याचे काम सुरू

सोलापूर : सोलापूरहून तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापूरच्या सात भाविकांचा अपघाती मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती तुळजापूर पोलिसांनी दिली़ यात महिला, पुरूष व लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे़  ही घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास सोलापूर-तुळजापूर मार्गावरील शीळ घाटात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोलापुरहुन तुळजापूरच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारवर मळीचा ट्रक उलटला़ या अपघातात कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़ जखमीवर उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे़ या अपघातानंतर या मार्गावरील वाहतुक खोळंबली होती़ अपघातानंतर तुळजापूरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.


 

Web Title: Accidents in Tuljapur Ghat, Solapur killed seven people on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.