पंढरपूर-मोहोळ मार्गावर अपघात; पंढरपूरचे तीन जण जागीच ठार, चार जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 17:15 IST2020-11-07T17:15:31+5:302020-11-07T17:15:49+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर-मोहोळ मार्गावर अपघात; पंढरपूरचे तीन जण जागीच ठार, चार जण जखमी
पंढरपूर : पंढरपूरकडे येणाऱ्या रिक्षाला मालवाहतूक ट्रकची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार झाले तर ४ जण जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
पंढरपूरकडे येणाऱ्या रिक्षा आणि ट्रक यांच्यात समोर समोर धडक झाली. रिक्षामध्ये एकूण ७ जण प्रवास करीत होते. त्यापैकी ३ जण ठार झाले आहेत. एक जण गंभीर जखमी असून त्याला लाइफ लाईन हॉस्पिटलमध्ये तर अन्य ३ जणांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त रिक्षातील सर्व प्रवासी एकमेकांच्या नात्यातील असल्याचे समजते. एका मयताचे नाव संदीप कोळी (रा. पंढरपूर) असल्याचे समजते तर इतर मयत आणि जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.