ट्रॅक्टरखाली सापडून दोघे जागीच ठार, बार्शीजवळील अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 19:46 IST2018-09-12T19:45:15+5:302018-09-12T19:46:09+5:30
हळदुगे ते लाडोळे मार्गावर घडला अपघात : ट्रॅक्टर उलटल्याने घडली घटना

ट्रॅक्टरखाली सापडून दोघे जागीच ठार, बार्शीजवळील अपघात
वैराग : बार्शी तालुक्यातील हळदुगे-लाडोळे मार्गावर ट्रॅक्टर उलटला अन् त्याखाली सापडून दोघे जागीच मरण पावले. बुधवारी दुपारी अडीच वाजता हा अपघात घडला. अनिल काशिनाथ बुरगुटे (वय-५५, रा. उपळे दुमाला, ता. बार्शी) आणि बाबुराव अभिमान गायकवाड (वय-५२, रा. हळदुगे, ता. बार्शी) अशी मरण पावलेल्यांची नाव आहेत.
बुरगुटे आणि गायकवाड हे दोघे एमएच-२५/एच-७९३६ या ट्रॅक्टरमधून हळदुगेहून लाडोळेकडे येत होते. मार्गावरील पुलाखाली ट्रॅक्टर उलटला आणि त्याखाली दोघे सापडून ठार झाले. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सपोनि धनंजय ढोणे आदी घटनास्थळी दाखल झाले.
वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. जयवंत गुंड यांनी शवविच्छेदन केल्यावर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. वैराग पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून, तपास हवालदार माणिक जाधव करीत आहेत.