शैक्षणिक समुपदेशन, काळाची गरज...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:51 AM2019-03-02T11:51:01+5:302019-03-02T11:51:54+5:30

मागील काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात प्रचंड बदल झालेला आहे. अनेक नवीन शिक्षण संस्था व त्या अंतर्गत नवीन कोर्सेस सुरू ...

Academic counseling, time needed ...! | शैक्षणिक समुपदेशन, काळाची गरज...!

शैक्षणिक समुपदेशन, काळाची गरज...!

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा सर्व उन्नतीसाठी किंवा प्रगतीसाठी विषय ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांची मानसिकता योग्यरितीने वाढीस ज्याचा प्रचलित शिक्षणपद्धतीमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये फारसा समावेश नाही

मागील काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात प्रचंड बदल झालेला आहे. अनेक नवीन शिक्षण संस्था व त्या अंतर्गत नवीन कोर्सेस सुरू झालेले आहेत. भवितव्य घडण्यासाठी अनेक नवीन क्षेत्रं उपलब्ध झाली आहेत. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू झाले आहेत व या सर्व कोर्सेसची शैक्षणिक संस्थातर्फे आक्रमक प्रसिद्धी होत आहे. यामुळे पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. याशिवाय या सर्व कोर्सेसची  व त्यामधील भवितव्य घडणीची योग्य व संपूर्ण माहिती पालक व विद्यार्थी यांना मिळत नाही. अर्धवट माहितीवर भवितव्य दिशा निवडल्यास विद्यार्थ्यांचे कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते. 

शैक्षणिक समुपदेशनाद्वारे विद्यार्थ्यांची आवड व क्षमता लक्षात घेतली जाते व त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन केले जाते. बºयाचवेळा पालकाच्या आग्रहास्तव किंवा इच्छेखातर विद्याशाखा निवडली जाते, परंतु त्यादृष्टीने त्या विषयात विद्यार्थ्यांची क्षमता नसते व त्यामुळे मानसिकताही नसते. म्हणून बºयाचवेळा अपयश येते व विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचतो. 

मानसोपचार तज्ज्ञांच्या सर्वेक्षणानुसार  सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचे सर्व कृतीमध्ये ३० % बुध्यांक व ७० % भावनांकाचा प्रभाव असतो. हल्लीच्या युवा पिढीच्या कृतीवर भावनांचा प्रभाव जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे कोणतीही कृती करताना विद्यार्थी त्या कृतीचे बुद्धीने विश्लेषण न करता भावनेच्या आहारी जाताना आढळतो. बहुतेकवेळा जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना चुका होतात किंवा चुकीची दिशा निवडली जाते. यासाठी हल्लीच्या युगात पालक फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. मुलांवर (पाल्यांवर) हक्क गाजवताना आपण त्यांच्या भावना ज्याचा भवितव्याशी संबंध आहे, हे लक्षात घेत नाही. 

प्रशिक्षित तज्ज्ञशिक्षक हे विषयतज्ज्ञ असतात त्यांनी दिलेले शिक्षण किंवा समुपदेशन हे त्याविषयाच्या ज्ञानापुरते मर्यादित असते. त्यांच्या शिकवण्याचा किंवा समुपदेशनाचा उपयोग हा विद्यार्थ्यांचा बुध्यांक वाढविण्यासाठी नक्कीच होतो, परंतु त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी किंवा भावनांशी फारसा संबंध येत नाही. 

विद्यार्थ्यांचा सर्व उन्नतीसाठी किंवा प्रगतीसाठी विषय ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांची मानसिकता योग्यरितीने वाढीस लागणे, हेही महत्त्वाचे आहे. ज्याचा प्रचलित शिक्षणपद्धतीमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये फारसा समावेश नाही. यासाठी शिक्षक किंवा पालक याशिवाय त्रयस्थ समुपदेशकाची आवश्यकता लागते. समुपदेशक विद्यार्थ्यांच्या मानसिकतेच्या स्वभावाचा ज्या वातावरणात विद्यार्थी वाढला आहे. त्या वातावरणाचा विश्लेषण करून विद्यार्थ्यांच्या भावनिक परिस्थितीचा अभ्यास करतो व त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक भावना वाढीस लागणे व नकारात्मक भावना कमी होणे. यादृष्टीने प्रयत्न करणे हा मानसोपचार असून यामुळे विद्यार्थ्यांच्या भावनांकाच्या बरोबर बुद्ध्यांक वाढीस लागतो व विद्यार्थ्यांची मानसिकता योग्य भवितव्याच्या दृष्टिकोनातून तयार होते. 

यास्तव विद्यार्थ्याला विविध कोर्सेसची योग्य माहिती, संस्थांची माहिती देण्यासाठी ब्रेन शैक्षणिक सल्ला केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रातर्फे विद्यार्थ्यांची आवड व क्षमता लक्षात घेऊन योग्य क्षेत्र निवडीस मदत केली जाते. एवढेच नव्हे तर सदर क्षेत्रातील योग्य संस्था निवड अभ्यास करण्याची पद्धती व योग्य नियोजन करून दिले जाते. यशाचे शिखर गाठेपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मागोवा घेतला जातो.
- शलाका कुलकर्णी
(लेखिका बाल व कुमार मानसोपचार अभ्यासक आहेत)

Web Title: Academic counseling, time needed ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.