Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर क्वालिफायर २ लढत होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 08:10 PM2024-05-24T20:10:05+5:302024-05-24T20:10:51+5:30

whatsapp join usJoin us
RR vs SRH, Qualifier 2 Marathi Live Update : 3 WICKETS IN 3 OVERS FOR Trent Boult IN POWERPLAY, SRH CEO Kavya Maran unhappy, SRH : 68/3 (6) Video  | Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा

Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RR vs SRH, Qualifier 2 Marathi Live Update : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चा दुसरा फायनलिस्ट आज ठरेल. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर क्वालिफायर २ लढत होत आहे. क्वालिफायर १ मध्ये पराभूत झाल्याने SRH ला फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याची दुसरी संधी आहे, तर RR ने एलिमिनेटर लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर मात करून इथवर मजल मारली. यजमान CSK खेळत नसल्याने चेपॉकचे स्टेडियम तितके भरलेले दिसत नाही. RRने नाणेफेक जिंकून SRHला प्रथम फलंदाजीला बोलावले. RR ने विजयी संघ कायम ठेवला आहे, तर हैदराबादने एडन मार्कराम व जयदेव उनाडकट अशा दोन सीनियर खेळाडूंना संघात पुन्हा बोलावले आहे.


संजूने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला खरा, परंतु अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचे आव्हान त्यांना पेलवणारे नव्हते. अभिषेकने ट्रेंट बोल्टच्या तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर ६,४ मारला. पण, शेवटच्या चेंडूवर बोल्टने विकेट मिळवली. अभिषेक ५ चेंडूंत १२ धावांवर झेलबाद झाला. संजूने दुसऱ्या षटकात आर अश्विनला आणले आणि तिसऱ्या चेंडूवर शॉर्ट थर्डला त्याचा झेलही उडालेला, परंतु तिथे फिल्डर नव्हता. राहुलने मिळालेल्या संधीचं सोनं करताना झटपट धावा कुटायला सुरुवात केली. सहाव्या चेंडूवर संजूने स्टम्पिंगची व रन आऊटचीही संधी गमावली. राहुलचं वादळ पाचव्या षटकात बोल्टने रोखलं. शॉर्ट बॉलवर अपर कट मारण्याच्या प्रयत्नात राहुल थर्ड मॅनला झेल देऊन बाद झाला. त्याने १५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ३७ धावा चोपल्या.  त्याच षटकात एडन मार्करम ( १)  यालाही बोल्टने माघारी पाठवले. 

हैदराबादला पॉवर प्लेमध्ये ३ बाद ६८ धावा करता आल्या. यंदाच्या पर्वात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक १२ विकेट्स बोल्टने घेतल्या, तर आयपीएल इतिहासात पॉवर प्लेमध्ये भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ७१ विकेट्स घेतल्या आहेत आणि बोल्ट ( ६२) दुसऱ्या क्रमांकावर आहे. बोल्टने त्याची पहिली स्पेल ३-०-३२-३ अशी पूर्ण केली. 

Web Title: RR vs SRH, Qualifier 2 Marathi Live Update : 3 WICKETS IN 3 OVERS FOR Trent Boult IN POWERPLAY, SRH CEO Kavya Maran unhappy, SRH : 68/3 (6) Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.