सोलापुरातून भाजी विक्रेत्याच्या मुलाचं अपहरण; पित्याची पोलीस ठाण्यात धाव

By विलास जळकोटकर | Updated: April 1, 2024 18:14 IST2024-04-01T18:13:58+5:302024-04-01T18:14:41+5:30

या प्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत भाजी विक्रेते असलेले इरफान उस्मान गनी बागवान (वय- ४९, रा. १४४, बेगम पेठ, सोलापूर) यांनी म्हटले आहे की, फिर्यादीचा मुलगा आयान हा विजापूर रोडवरील भारती विद्यापीठ येथे इयत्ता १२ मध्ये शिक्षण घेत आहे. फिर्यादी आपल्या कुटुंबासमवेत बेगम पेठ येथे वास्तव्यास आहेत.

Abduction of vegetable seller's son from Solapur; Father's run to the police station | सोलापुरातून भाजी विक्रेत्याच्या मुलाचं अपहरण; पित्याची पोलीस ठाण्यात धाव

सोलापुरातून भाजी विक्रेत्याच्या मुलाचं अपहरण; पित्याची पोलीस ठाण्यात धाव

 
सोलापूर : भाजी विक्रेत्याच्या मुलाचं राहत्या घरापासून कोणीतरी फूस लाऊन अपहरण केले. शोधाशोध घेऊन अखेर पित्याने जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. आयान इरफान बागवान (वय १७, बेगम पेठ, सोलापूर) असे अपरण झालेल्या कॉलेजकुमार मुलाचं नाव आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत भाजी विक्रेते असलेले इरफान उस्मान गनी बागवान (वय- ४९, रा. १४४, बेगम पेठ, सोलापूर) यांनी म्हटले आहे की, फिर्यादीचा मुलगा आयान हा विजापूर रोडवरील भारती विद्यापीठ येथे इयत्ता १२ मध्ये शिक्षण घेत आहे. फिर्यादी आपल्या कुटुंबासमवेत बेगम पेठ येथे वास्तव्यास आहेत. भाजी विक्रीच्या व्यवसायवर त्यांची गुजराण चालते.

 रात्री ९ च्या सुमारास फिर्यादीचा मुलगा घरातून बाहेर पडला तो परत न आल्याने आजूबाजूच्या परिसरासह नातलगाकडे त्याची चौकशी केली मात्र सापडला नाही. फिर्यादीने जेलरोड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. कोणीतरी त्याला फूस लावून त्याचे अपहरण केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. अधिक तपास सहा. फौजदार झेड. एन. काझी करीत आहेत.
 

 

Web Title: Abduction of vegetable seller's son from Solapur; Father's run to the police station