शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीला उजनीचे पाणी नाही

By admin | Updated: June 27, 2014 01:14 IST

उजनी वजा २२ वर : गुरसाळे बंधाऱ्यातून चंद्रभागेत सोडणार पाणी

पंढरपूर : उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने लाभक्षेत्रात पाणीटंचाई निर्माण होत आहे. अशात उजनी धरणाची पाणी पातळी वजा २२ टक्के इतकी खाली गेल्याने आषाढी यात्रेसाठी उजनी धरणातून पाणी सोडणे शक्य नसल्याचे चित्र आहे. वारीसाठी गुरसाळे बंधाऱ्यातून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे कमी पाण्यातच वारकऱ्यांना चंद्रभागेत स्नान उरकावे लागणार आहे.गेल्या महिन्यात १९ मे रोजी उजनी धरणातून भीमानदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. या पाण्याने भीमा नदीवरील बंधाऱ्यात पाणी साठविण्यात आले आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरसाळे, पंढरपूर बंधाराही भरून घेण्यात आला असून वारीसाठी गरज भासली तर गुरसाळे बंधाऱ्यातून पाणी सोडले जाईल, असे विभागाचे कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे यांनी सांगितले.पंढरपूर पंचायत समितीच्या वतीने यात्रा काळात उजनी धरणातून आणि नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी पत्र देऊन करण्यात आली आहे. ते पत्र आपण कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठविल्याचे शिंदे म्हणाले. उजनी धरणाखालील आलेगाव बंधारा सोडला तर भीमा नदीवरील अरळी बंधाऱ्यापर्यंतचे १४ बंधारे पाण्याने परिपूर्ण भरले आहेत. रोहिणी, मृग, आर्द्रासह सर्व नक्षत्रे कोरडी गेली आहेत. उन्हाची तीव्रता वाढली असून पाण्याअभावी पिके धोक्यात येण्याची भीती वाढल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशी परिस्थिती असताना उजनीतून पाणी सोडणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांबरोबरच वारकऱ्यांचे पाण्याविना हालच होणार आहेत. उजनी धरणावर विविध शहरांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून असून शासन पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देते. पावसाने ओढ दिल्याने विहिरी, बोअर आटू लागले असून ५०० फुटांपर्यंत बोअर खोल गेले तरी पाणी लागेना, इतकी पाणी पातळी खोल गेल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.--------------------------पाणीटंचाई भासणारपंढरपूर बंधाऱ्यातून पंढरपूर, सांगोला या शहरांसाठी पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय सोलापूरच्या पाण्याची भिस्तही उजनीवरच आहे. पंढरपूर बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर त्यात वरच्या बाजूला असलेल्या गुरसाळे बंधाऱ्यातून पाणी सोडले जाते. आता गुरसाळे बंधाऱ्यातूनच पाणी सोडण्यात येणार असल्याने भविष्यात पाऊस लांबल्यानंतर पाणीपुरवठा योजनेला पाणी नसण्याची अधिक शक्यता आहे. --------------------------------उजनी धरण मायनस २२ टक्क्यांवर गेल्याने वारीसाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडणे सध्या अशक्य आहे. गुरसाळे बंधाऱ्यात सध्या मुबलक पाण्याचा साठा असल्याने त्यातील पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे चंद्रभागेत वारकऱ्यांसाठी स्नानासाठी पाणी येणार आहे.- सर्जेराव शिंदेअभियंता, भीमा पाटबंधारा, पंढरपूर विभाग