मुलीनं पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर अत्याचार

By रवींद्र देशमुख | Updated: April 11, 2024 17:50 IST2024-04-11T17:49:28+5:302024-04-11T17:50:17+5:30

पिडितेची तक्रार : तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल.

a woman was tortured to withdraw the complaint given by the girl to the police in solapur | मुलीनं पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर अत्याचार

मुलीनं पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर अत्याचार

रवींद्र देशमुख , सोलापूर : ‘तुझ्या मुलीनं माझ्याविरुद्ध पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घे’ अशी दमदाटी करीत अत्याचार केल्याची तक्रार महिलेने फौजदार चावडी पोलिसात दिली आहे. नवीन पुना नाका परिसरात रात्री ९:३० च्या सुमारास ही घटना घडल्याचे पिडितेने म्हटले आहे. या प्रकरणी किशोर प्रताप गायकवाड (मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी ही मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नवीन पुना येथे कामानिमित्त गेलेली होती. यावेळी नमूद आरोपी तेथे आला, त्याने फिर्यादीला लाडीगोडी लावून ‘तुझ्या मुलीने माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ती मागे घे’ अशी दमदाटी करत टोल नाक्याच्या मोकळ्या जागेत नेवून अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तपास महिला फौजदार जेऊघाले करीत आहेत.

Web Title: a woman was tortured to withdraw the complaint given by the girl to the police in solapur