रिक्षातून कॉलेजला जाणाऱ्या मुलीशी अश्लील चाळे, पोक्सोचा गुन्हा दाखल

By रूपेश हेळवे | Updated: August 13, 2023 13:34 IST2023-08-13T13:33:27+5:302023-08-13T13:34:33+5:30

या बाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीवरून हमजा अब्दुल माजीद शेख ( रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

A case of indecent molestation, POCSO has been registered with a girl going to college in a rickshaw | रिक्षातून कॉलेजला जाणाऱ्या मुलीशी अश्लील चाळे, पोक्सोचा गुन्हा दाखल

रिक्षातून कॉलेजला जाणाऱ्या मुलीशी अश्लील चाळे, पोक्सोचा गुन्हा दाखल

सोलापूर : रिक्षातून कॉलेजला जात असताना १६ वर्षीय पीडितेच्या शेजारी बसून तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीवरून हमजा अब्दुल माजीद शेख ( रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पीडित ही शनिवारी दुपारी रिक्षातून स्टॅन्ड ते सात रस्ता कडे जात असताना आरोपी शेख हा तिच्याजवळ येऊन बसला. सूरूवातीला त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आरोपीने पीडितेचा हात पकडून तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. याप्रकरणी आरोपी हमजा शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: A case of indecent molestation, POCSO has been registered with a girl going to college in a rickshaw