ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक, चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू तर आठ जण जखमी

By रूपेश हेळवे | Updated: December 2, 2022 19:19 IST2022-12-02T19:18:41+5:302022-12-02T19:19:05+5:30

सोलापूर येथे ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली ज्यात चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. 

 A 14-year-old girl died in a head-on collision between a truck and a rickshaw in Solapur | ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक, चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू तर आठ जण जखमी

ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक, चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू तर आठ जण जखमी

सोलापूर : मार्केटयार्ड जवळील शेळगी रस्त्यावर ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात मिजबा शुकूर मुलाणी या चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे तर इतर आठ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरबू कुटुंबीय हे मित्र नगरहून शहापुरअली दर्गा येथे जात होते. त्यावेळी परमशेट्टी मिल चौक परिसरात समोरून येणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिली. या धडकेत रिक्षा पलटी होऊन दुसर्या बाजूला गेली. यात रिक्षाचा अक्षर: चक्काचूर झाला. यात जखमी झालेल्यांना नागरिकांनी दुचाकी व दुसर्या रिक्षाने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 

Web Title:  A 14-year-old girl died in a head-on collision between a truck and a rickshaw in Solapur