एसटी महामंडळाच्या ९६ लालपरीने ६२७ प्रवाशांना घेऊन जिल्ह्याची वेस ओलांडली

By appasaheb.patil | Published: August 21, 2020 12:15 PM2020-08-21T12:15:08+5:302020-08-21T12:17:47+5:30

प्रवासाला निघाले सोलापूरकर; लॉकडाऊननंतर प्रथमच लांबचा प्रवास  

96 red carriages of ST Corporation crossed the district gate carrying 627 passengers | एसटी महामंडळाच्या ९६ लालपरीने ६२७ प्रवाशांना घेऊन जिल्ह्याची वेस ओलांडली

एसटी महामंडळाच्या ९६ लालपरीने ६२७ प्रवाशांना घेऊन जिल्ह्याची वेस ओलांडली

Next
ठळक मुद्देतब्बल १५१ दिवसांनंतर सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपºयात पुन्हा एकदा लालपरी प्रवाशांना घेऊन धावलीपहिल्या दिवशी सोलापूर आगारातून पुणे, उस्मानाबाद, कोल्हापूर, सातारा, कराड, विजापूर, बीड, उमरगा या गाड्यांना प्रवाशांची किमान गर्दी होतीप्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढेल, असा विश्वास एस.टी.च्या सोलापूर विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी व्यक्त केला

सोलापूर : तब्बल १५१ दिवसांनंतर सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपºयात पुन्हा एकदा लालपरी प्रवाशांना घेऊन धावली़ पहिल्या दिवशी सोलापूर आगारातून पुणे, उस्मानाबाद, कोल्हापूर, सातारा, कराड, विजापूर, बीड, उमरगा या गाड्यांना प्रवाशांची किमान गर्दी होती. आज दिवसभरात ९६ बस जिल्ह्याबाहेर धावल्या. प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढेल, असा विश्वास एस.टी.च्या सोलापूर विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी व्यक्त केला. प्रवासासाठी सॅनिटायझर आणि मास्क मात्र बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव  झाल्यानंतर मार्च २०२० मध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात १५ मार्चपासून टप्प्याटप्प्याने तर २३ मार्चपासून एसटी बसच्या फेºया बंद करण्यात आल्या. जिल्हा, आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवासी वाहतूक बंद झाली. दरम्यान, मे महिन्यात एसटीने परप्रांतीय मजूर, विद्यार्थी आदींना सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी आंतरराज्य सेवा दिली. २२ मेपासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू होती, बुधवारी शासनाने काढलेल्या आदेशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच आगारातून एसटी बस धावल्याची माहिती विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली़ सकाळी साडेपाच वाजता सोलापूर-बार्शी ही पहिली एसटी गाडी सुटली, त्यात एकही प्रवासी नव्हता, गाडीत फक्त चालक व वाहकच असल्याचे सांगण्यात आले़ गुरुवारी दिवसभर एसटी बसस्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी हजेरी लावली.

वंचितने केला जल्लोष...
सोलापूर ते स्वारगेट ही एमएच १३ सीयू ८३३९ एसटी बस सोलापूर स्थानकातून सुटणार होती़ यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्या हस्ते गाडीची विधिवत पूजा करण्यात आली़ यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी प्रवास करणाºया प्रवाशांना लाडू वाटून, फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला़ दरम्यान, प्रवाशांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले़ यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्या अंजना गायकवाड, वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेश्मा मुल्ला, पल्लवी सुरवसे, सुजाता वाघमारे, नगरसेवक गणेश पुजारी, बबन शिंदे, श्रीमंत जाधव, नानासाहेब कदम, शिवाजी बनसोडे, हणमंतु पवार, विजय बमगोंडे, रवी थोरात, विनोद इंगळे, चंद्रकांत सोनवणे, देविदास चिंचोळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़ 

चौकशी केंद्रावर अधिक गर्दी...
एसटी सुरू झाल्याची माहिती समजताच प्रवाशांनी सोलापूर बसस्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाविषयी माहिती घेण्यासाठी व कोणती गाडी कधी सुटणार आहे, कधी येणार आहे याबाबतची माहिती घेण्यासाठी चौकशी केंद्रावर प्रवाशांनी गर्दी केली होती़ दिवसभर नियंत्रण कक्षातून कोणती गाडी कोणत्या फलाट क्रमांकावर लागली याबाबतच्या सूचना एसटी अधिकाºयांकडून स्पीकरवरून देण्यात येत होत्या़ 

चालक-वाहकानेच केली एसटीची स्वच्छता
बºयाच दिवसांपासून बंद असलेल्या एसटी बस गुरुवारी बाहेर काढण्यात आल्या़ बसमध्ये बºयाच प्रमाणात कचरा साचला होता. शिवाय काचेवर व सीटवर धूळ साचली होती़ वाहक व चालकाने कोणाचीही मदत न घेता स्वत:हून एसटी बसची स्वच्छता करून घेतली़ कागदाच्या साह्याने काच साफ केली़

Web Title: 96 red carriages of ST Corporation crossed the district gate carrying 627 passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.