दोन महिन्यांत ४४९ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:22 AM2021-05-12T04:22:41+5:302021-05-12T04:22:41+5:30

अक्कलकोट : शासकीय निवासी शाळेतील कोविड केअर सेंटरवरील वैद्यकीय दूत हे ध्येयाने झपाटून रुग्णसेवा सुरू केली. परिणामत: दोन महिन्यात ...

449 patients corona free in two months | दोन महिन्यांत ४४९ रुग्ण कोरोनामुक्त

दोन महिन्यांत ४४९ रुग्ण कोरोनामुक्त

Next

अक्कलकोट : शासकीय निवासी शाळेतील कोविड केअर सेंटरवरील वैद्यकीय दूत हे ध्येयाने झपाटून रुग्णसेवा सुरू केली. परिणामत: दोन महिन्यात ४४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

९ मार्च २०२१ मध्ये येथील शासकीय निवासी शाळेत कोविड केअर सेंटर सुरू झाले. या दोन महिन्यांत या केंद्रात ७३८ कोरोनाबाधित दाखल झाले. त्यांच्यापैकी ४४९ रुग्ण बरे झाले. ९३ बाधितांना इतर प्रकारचा त्रास होत असल्याने व ऑक्सिजन नसल्याने त्यांना इतरत्र हलविले. शासकीय कोविड केअर सेंटर व अन्नछत्र मंडळातील कोविड सेंटर येथे १९६ बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

एआयएमएसच्या प्रोटोकॉलनुसार उपचार केले जात आहेत. फुप्फुसासाठी टेस्ट थेरपी, रेसप्रायोमेटरी आहार, योगा स्टीम, प्राऊन पोजिशन (पालथे झोपविणे) यासोबत सगळ्यांना मानसिक धीर देणे व मनोबल वाढवण्याचे काम केले जात आहे.

निवासी शाळा येथील कोविड केअर सेंटर येथे बाधितांना अंघोळीसाठी दररोज गरम पाणी, पिण्यासाठी फिल्टर केलेले पाणी पुरविले जाते. स्वच्छतेवर भर दिला जातो. आहार वेळेवर दिला जातो. जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विन करजखेडे, वैद्यकीय अधीक्षक अशोक राठोड, डॉक्टर निखिल क्षीरसागर यांचे वैद्यकीय पथक कार्यरत आहेत. अन्नछत्र मंडळ येथील कोविड केअर सेंटर येथे इनचार्ज डॉ. शिंदे व डॉ. मंजुनाथ पाटील व तीन सीएचओ व दोन परिचारिकांच्या मदतीने उपचार करत आहेत. शासकीय निवासी शाळेतील कोविड केअर येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मारकड, डॉ. शिवलीला माळी व तीन सीएचओ व दोन परिचारिका यांच्या साहाय्याने उपचारा सुरू आहेत. दोन १०२चे व एक १०८चे ॲम्ब्युलन्सची सुविधा सुरू आहे. स्वामी समर्थ रुग्णालयातील डीसीएचसी सेंटरमध्ये २८ बाधित उपचार घेत आहेत.

---

तहसीलदार, आमदार हे रुग्णांची चौकशी करतात. याचा प्रत्यंतर आला. येथील वैद्यकीय अधिकारी वारंवार संवाध साधून तपासण्या करता, मानसिक आधार देतात. या सेवाधारींचा जनता ऋणी राहील.

- रविकांत धनशेट्टी

रुग्ण

----

पत्नीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवसी सेवेत

शासकीय रुग्णालयात उपचार देणारे डॉ. गजानन मारकड डॉ. गजानन मारकड हे मूळचे यवतमाळचे. पत्नी ज्योती यांचे अल्पशा आजाराने तीन दिवसांपूर्वी निधन झाले. पत्नी विरह बाजूला ठेवून रुग्णांना सेवा द्यायला सुरुवात केली आहे. त्यांच्याप्रमाणे डॉक्टर व कर्मचारी कुटुंबातील सदस्याचा विचार न करता, न घाबरता उर्वरित जीवनच आरोग्य सेवेसाठी अर्पण केले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी व तहसीलदार अंजली मरोड यांनीही त्यांच्या सेवेचे कौतुक केले आहे.

---

फोटो : ११ अक्कलकोट कोरोना

अक्कलकोट येथील सीसीसी सेंटरमध्ये कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देताना डॉ. गजानन मारकड, डॉ. शिवलीला माळी.

Web Title: 449 patients corona free in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.