शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

३७ रेशन दुकानांचे परवाने रद्द

By admin | Updated: July 2, 2014 00:40 IST

पुरवठा अधिकारी चव्हाण: अनेक राजकीय लोकांची ‘दुकानदारी’ बंद

सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील रेशन दुकाने ही राजकारण्यांचे ‘कुरण’ बनल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून गाजत असलेल्या या दुकानदारांची सुनावणी घेऊन तब्बल ३७ रेशन दुकानांचे परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण यांनी कायमचे बंद केले आहेत़आॅक्टोबर २०१३ मध्ये जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी प्रत्येक तहसीलदारांना रेशन दुकानांचे परवाने तपासण्याचे आदेश दिले होते़ अक्कलकोटचे तत्कालीन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी अक्कलकोट तालुक्यातील ४४ रेशन दुकानांची तपासणी केली होती़ बोगस धान्य वाटप, धान्यामध्ये अफरातफर, जादा दराने धान्य विक्री आदी सात प्रकारच्या तक्रारी होत्या़ त्यामुळे या सर्व रेशन दुकानांचे दफ्तर जप्त करुन मंडल अधिकारी आणि तलाठ्यांच्या पथकाने तपासणी करुन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता़ त्यानुसार अक्कलकोट पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल फेब्रुवारी २०१४ रोजी अक्कलकोट पोलीस ठाण्याकडे दिला होता; मात्र कोणतीही कारवाई झाली नाही़ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्या ४४ रेशन दुकानदारांची सुनावणी पुरवठा अधिकारी चव्हाण यांनी १० दिवसांपूर्वी घेतली़ यापैकी ७ जणांचे म्हणणे समाधानकारक वाटल्यामुळे उर्वरित ३७ जणांचे परवाने कायमचे रद्द केले आहेत़ -------------------------येथील परवाने झाले रद्ददुधनी ८, मैंदर्गी ७, बोरोटे १, उडगी २, इब्राहिमपूर २, आंदेवाडी, हालहाळी, सलगर, संगोगी, नागारे, भोसगे, चिक्केहळ्ळी, बिंजगेरी, चिंचोळी, हत्तीकणबस, बबलाद, बासलेगाव, जकापूर, कल्लप्पावाडी, परमतांडा.--------------------------अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी परिसरातील ४४ रेशन दुकानांच्या तक्रारी होत्या, सर्व दफ्र तपासून सुनावणी घेऊन ३७ दुकानांचे परवाने रद्द केले आहेत़ शेजारील दुकानांना हा तात्पुरता परवाना दिला असून लवकरच प्रसिद्धीकरण करुन रेशन दुकानांचे नवे परवाने दिले जातील़-रमेश चव्हाणजिल्हा पुरवठा अधिकारी