शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे ३३ कुटुंबांना मिळाली ६६ लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 13:43 IST

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना; जिल्हाधिकाºयांनी घेतली दखल

ठळक मुद्देगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रस्ताव मंजुरीला लोकमतच्या वृत्तानंतर वेग आला जिल्हाधिकाºयांनी बैठकीत विमा कंपनीला पेंडिंग प्रस्ताव मार्गी लावण्याच्या दिलेल्या सूचनांमुळे  ३३ कुटुंबांना प्रत्येकी दोन लाखांप्रमाणे ६६ लाख इतकी मदत मिळाली

सोलापूर:  गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात विमा योजनेचे प्रस्ताव मंजुरीला लोकमतच्या वृत्तानंतर वेग आला आहे. ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्याने जिल्हाधिकाºयांनी बैठकीत विमा कंपनीला पेंडिंग प्रस्ताव मार्गी लावण्याच्या दिलेल्या सूचनांमुळे  ३३ कुटुंबांना प्रत्येकी दोन लाखांप्रमाणे ६६ लाख इतकी मदत मिळाली आहे.

गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात विमा योजनेनुसार अपघातात, सर्पदंशाने, पाण्यात बुडून, झाडावरुन पडल्याने शेतकºयाचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. २०१६-१७ व २०१८ या वर्षात दाखल झालेल्या प्रकरणांचा निपटारा कंपनीकडून होत नसल्याने मयत शेतकºयांचे वारस कुटुंब मदतीपासून वंचित असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते.

वृत्तमालिकेद्वारे हा विषय प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असतानाही    जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय व ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाºयांच्या दोन बैठका घेतल्या. पहिल्या बैठकीत कृषी खात्याने विम्यासाठी पाठविलेल्या प्रकरणांची संख्या व विमा कंपनीकडील संख्येचा ताळमेळ लागत नसल्याने पुन्हा बैठक घेतली. लोकमतने वृत्तमालिका सुरू करताना २०१८ मध्ये आर्थिक मदत मिळालेल्या प्रस्तावांची संख्या ४७ होती. जिल्हाधिकाºयांनी घेतलेल्या दुसºया बैठकीपर्यंत ही संख्या ५४ इतकी झाली तर सध्या प्रत्येकी दोन लाख मिळालेल्या कुटुंबांची संख्या ८७ इतकी झाली आहे. म्हणजे दुसºया बैठकीनंतर तब्बल ३३ कुटुंबांना ६६ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

नव्याने प्रस्तावांना मंजुरी देत असताना दारुच्या नशेत गाडी चालवून अपघात केला, परवाना नसताना गाडी चालवली या कारणामुळे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने १३ प्रस्ताव नामंजूर केले आहेत.

‘ट्रीपलसीट’ही मदतीस अपात्रच..

  • - ट्रीपलसीट असताना गाडी चालविताना अपघात झाल्याने मृत्यू झाल्याने एका प्रस्तावाला मदत नाकारली.
  • - परवाना नसताना वाहन चालवित असताना अपघात झाल्याने मृत्यू झाल्याचे १२ प्रस्ताव नामंजूर केले.
  • - अवैधरित्या पोलवर चढल्याने अपघातात शॉक बसून मृत्यू झालेल्या एकाला मदत नाकारली.
  • - ७५ पेक्षा अधिक वय असलेल्या चौघांची प्रकरणे अपात्र केली.
  • - सातबारा नसलेल्या दोघांना तर ६ ड वर नाव नसलेल्या चौघांचे प्रस्ताव नामंजूर केले.
  • - वेडाच्या भरात पाण्यात पडल्याने मृत्यू झालेल्या एकाचा प्रस्ताव अपात्र ठरविला. 

आजही ७० कुटुंबे वेटिंंगवर.. - २०१८ मधील मृत्यू झालेल्या शेतकºयांची विमा कंपनीकडे कार्यवाहीसाठी ३९ व तालुका कृषी अधिकाºयांकडे त्रुटी पूर्ततेसाठी ३१ प्रस्ताव आजही  पेंडिंग आहेत. कंपनीने तत्काळ मयत शेतकºयांच्या वारसदाराच्या खात्यावर प्रत्येकी दोन लाख रुपये जमा करणे आवश्यक आहे. कृषी खात्याच्या कर्मचाºयांनी कागदपत्राच्या त्रुटी पूर्ण केल्या तर ३१ कुटुंबांना मदत मिळू शकते. 

टॅग्स :Solapurसोलापूरgovernment schemeसरकारी योजनाGopinath Mundeगोपीनाथ मुंडेFarmerशेतकरीagricultureशेती