दावोसमध्ये ३ लाख ५३ हजार कोटींचे सामंजस्य करार; एकनाथ शिंदेंची PM मोदींसमोर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 02:43 PM2024-01-19T14:43:20+5:302024-01-19T14:43:53+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते या रे नगर वसाहतीचे भूमिपूजन करण्यात आले होते.

3 lakh 53 thousand crore MoU in Davos; Information of CM Eknath Shinde before PM Narendra Modi | दावोसमध्ये ३ लाख ५३ हजार कोटींचे सामंजस्य करार; एकनाथ शिंदेंची PM मोदींसमोर माहिती

दावोसमध्ये ३ लाख ५३ हजार कोटींचे सामंजस्य करार; एकनाथ शिंदेंची PM मोदींसमोर माहिती

सोलापूर जिल्ह्यातील रे नगर मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ३० हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे लोकार्पण आज संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना चावी वाटप करण्यात आले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते या रे नगर वसाहतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. आज त्यांच्याच हस्ते देशातील सगळ्यात मोठ्या कामगार वसाहतीतील घरांचे चावी वाटप संपन्न होत आहे. हीच मोदी गॅरेंटी आहे. रे म्हणजे आशेचा किरण, आज पंतप्रधान मोदी हेच गरिबांसाठी आशेचा किरण असून त्यांच्यामुळेच गरिबांचे जीवन प्रकाशमान झाले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. 

काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूचे लोकार्पण झाले. आज पंतप्रधानांच्या सहकार्यानेच राज्यात सर्वाधिक पायाभूत विकास प्रकल्प राबविले जात आहेत. मी स्वतः दावोस वरून कालच परतलो. तिथे ३ लाख ५३ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. दावोसमध्येही पंतप्रधान मोदी यांचे नाव घेतले जात होते, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे देखील उपस्थित होते.

सोलापूरात पंतप्रधान मोदींच्या डोळ्यांत पाणी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सर्व सामान्य कष्टकरी लोकांना घर किती महत्वाचे असते याची जाणीव मला आहे. आज जे घर तुम्हाला मिळत आहे, ते पाहून मला असे वाटते की कदाचीत मीही लहानपणी अशा घरात राहिलो असतो तर असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भावूक झाले आणि त्यांचा बोलताना अचानक आवाज बदलला अन त्यांच्या डोळ्यात आश्रू तरळले. २२ जानेवारी रोजी आयोध्यामध्ये प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होत आहे. त्या दिवशी गरीबांचा अंधकार दूर होईल. तुमच जीवन आनंदाने भरू जावो अशी सदिच्छा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणाने उपस्थित लोकही भावनीक झाले होते. 

Web Title: 3 lakh 53 thousand crore MoU in Davos; Information of CM Eknath Shinde before PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.