युक्रेनहून आणखी १९ विद्यार्थी भारतात परतले; पालकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2022 17:10 IST2022-03-06T17:10:29+5:302022-03-06T17:10:36+5:30

सोलापूर : युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतात येणाऱ्या सोलापुरातील विद्यार्थ्यांची संख्या आता ३३ झाली आहे. शनिवार ५ मार्च रोजी १९ विद्यार्थी ...

19 more students return to India from Ukraine; The parents let out a sigh of relief | युक्रेनहून आणखी १९ विद्यार्थी भारतात परतले; पालकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

युक्रेनहून आणखी १९ विद्यार्थी भारतात परतले; पालकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

सोलापूर : युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतात येणाऱ्या सोलापुरातील विद्यार्थ्यांची संख्या आता ३३ झाली आहे. शनिवार ५ मार्च रोजी १९ विद्यार्थी भारतात परतले. बहुतांश विद्यार्थ्यांचे दिल्लीतील विमानतळावर आगमन झाले.

युक्रेनमध्ये अडकलेल्या एकूण ३६ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्यार्थी हे आता भारतात सुखरूप परतले आहेत, तर आणखी दोन विद्यार्थी हंगेरी येथील विमानतळावर विमानाच्या प्रतीक्षेत आहे. एक ते दोन दिवसात ते देखील भारतात परतणार आहेत. याशिवाय सोलापुरातील आणखी दोन विद्यार्थी हे युक्रेनमध्येच आहेत.

रोमानिया व हंगेरी येथील विमानतळावरून निघालेले विद्यार्थी हे भारतात शनिवारी ५ मार्च रोजी पहाटे चार वाजता पोहोचले. दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे सर्व विद्यार्थ्यांना आणण्यात आले. तिथून हे विद्यार्थी आपल्या मूळ गावी जातील.

Web Title: 19 more students return to India from Ukraine; The parents let out a sigh of relief