शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पुणे विभागातील १५ साखर कारखान्यांकडे ‘एफआरपी’ चे १५१ कोटीची थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 10:52 AM

पुणे विभागातील एफआरपी : सोलापूरच्या ११ कारखान्यांकडील ९० कोटींचा समावेश

ठळक मुद्दे२०१७-१८ चा ऊस गळीत हंगाम मार्च २०१८ मध्ये संपलापुणे जिल्ह्यातील एका कारखान्याकडे ६ कोटी ७ लाख ४४ हजार थकबाकीसातारा जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांकडे ५५ कोटी ६ लाख ९६ हजार रुपये थकबाकी

अरूण बारसकर  सोलापूर: पुणे विभागातील सोलापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांकडे मागील वर्षीच्या उसाचे ‘एफआरपी’ नुसार(किमान व किफायतशीर दर) १५१ कोटी ५५ लाख १८ हजार रुपये  इतके शेतकºयांचे देणे थकले आहे. यामध्ये  सोलापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांकडील ९० कोटी ७० लाख ८ हजार रुपयांचा समावेश आहे, अशी माहिती साखर संचालकांच्या कार्यालयातून देण्यात आली.

२०१७-१८ चा ऊस गळीत हंगाम मार्च २०१८ मध्ये संपला. गाळप संपल्यापासून शेतकºयांचे उसाचे पैसे देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे; मात्र काही साखर कारखान्यांनी एफआरपीनुसारही शेतकºयांचे पैसे दिले नाहीत. मागील वर्षी पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील १७, साताराच्या १५ व सोलापूरच्या ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यामध्ये गोकुळ माऊली साखर कारखान्याने चाचणी हंगाम घेतल्याने १३ हजार १४८ मे.टन गाळप झाले होते.

पुणे विभागातील गाळप घेतलेल्या ६३ पैकी ४८ साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’नुसार व काही कारखान्यांनी ‘एफआरपी’ पेक्षाही अधिक रक्कम ऊस उत्पादक शेतकºयांना दिली आहे. पुणे जिल्ह्यातील एका कारखान्याकडे ६ कोटी ७ लाख ४४ हजार तर सातारा जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांकडे ५५ कोटी ६ लाख ९६ हजार रुपये थकबाकी आहे. प्रादेशिक संचालक व साखर आयुक्तांनी शेतकºयांचे पैसे देण्याबाबत नोटिसा देऊनही कारखाने पैसे देण्यास तयार नाहीत. यापैकी काही साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसीनुसार कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले असले तरी त्याला सहकारमंत्र्यांनीच स्थगिती दिली आहे. सहकारमंत्र्यांनी कारखान्यांना शेतकºयांचे पैसे देण्यासाठी संधी दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याने संपूर्ण थकीत रक्कम दिली आहे.

मातोश्री शुगरकडे सर्वाधिक थकबाकी 

च्सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे २२ कोटी २४ लाख, संत दामाजी ४ कोटी २७ लाख ४९ हजार, विठ्ठल साखर कारखान्याकडे १९ कोटी ४० लाख ४७ हजार, मकाई साखर कारखान्याकडे एक कोटी ५९ लाख ४२ हजार, संत कूर्मदास कारखान्याकडे ६५ लाख ८२ हजार, सिद्धनाथ शुगरकडे ५ कोटी १२ लाख, गोकुळ शुगरकडे ५ कोटी ७१ लाख, मातोश्री लक्ष्मी शुगरकडे २३ कोटी ७१ लाख ५२ हजार, बबनराव शिंदे कारखान्याकडे एक कोटी ९६ लाख ५० हजार, जयहिंद शुगरकडे ६२ लाख तर विठ्ठल रिफाईन शुगरकडे ६ कोटी ९ लाख ७९ हजार रुपये इतकी थकबाकी आहे.

च्सातारा जिल्ह्यातील न्यू फलटणकडे ४८ कोटी ४१ लाख ८२ हजार, ग्रीन पॉवरकडे ४ कोटी ९ लाख ५७ हजार तर स्वराज इंडियाकडे दोन कोटी २५ लाख ५७ हजार तर पुणे जिल्ह्यातील राजगड कारखान्याकडे ६ कोटी ७ लाख ४४ हजार रुपये इतकी थकबाकी आहे. 

लोकमंगल साखर कारखान्याने २२०० रुपयांप्रमाणे तर सिद्धेश्वरने १८०० रुपयांप्रमाणे पैसे देण्यास सुरुवात केली आहे. भीमा साखर कारखान्याने संपूर्ण थकबाकी दिली आहे. अन्य कारखान्यांनीही थकबाकी द्यावी यासाठी गुरुवारी सहकारमंत्र्यांना निवेदन देणार आहोत.- महामूद पटेल,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी