झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 15:45 IST2025-11-26T15:44:49+5:302025-11-26T15:45:44+5:30
Zepto Pune Viral video: पुण्यात एक झेप्टो डिलिव्हरी एजंट एका बंगल्यात ऑर्डर देण्यासाठी गेला होता. पत्ता शोधताना त्याला अडचणी येत असल्यामुळे त्याने वारंवार फोन करून पत्ता विचारला.

झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
पुणे शहरात एका ग्राहकाने त्याने मागविलेल्या वस्तूंची डिलिव्हरी देण्यास आलेल्या झेप्टो डिलिव्हरी एजंटला कथितरित्या शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मात्र, या एका डिलिव्हरी एजंटवर हात उचलणाऱ्या ग्राहकाला जेव्हा त्याच्या 'झेप्टो' सहकाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, तेव्हा त्याला नमते घ्यावे लागले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
पुण्यात एक झेप्टो डिलिव्हरी एजंट एका बंगल्यात ऑर्डर देण्यासाठी गेला होता. पत्ता शोधताना त्याला अडचणी येत असल्यामुळे त्याने वारंवार फोन करून पत्ता विचारला. याच गोष्टीवरून संतापलेल्या ग्राहकाने कथितरित्या डिलिव्हरी एजंटला शिवीगाळ केली आणि त्याच्यावर हात उगारला. एका व्हायरल व्हिडिओमध्ये एजंटने ग्राहकाने गळा पकडल्याचा आणि मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
अपमानित झालेल्या एजंटने ही गोष्ट आपल्या अन्य सहकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर, जवळपास २० हून अधिक झेप्टो डिलिव्हरी एजंट्स दुचाकींवरून एकत्र जमले आणि त्या ग्राहकाच्या घराकडे गेले. एवढ्या मोठ्या संख्येने डिलिव्हरी एजंट्स अचानक घरी आल्याचे पाहून ग्राहक हादरला होता. तरीही तो सुरुवातीला वाद घालत होता. वाद वाढताना पाहिले आणि आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर त्याने अखेर त्या डिलिव्हरी एजंटची माफी मागितली आणि त्याला मिठी मारली. त्यानंतर, त्याने आलेल्या एजंट्सना पाणी विचारून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना @mohd_pathan077 नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे, ज्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.