तरुणींना इम्प्रेस करायला स्टंट करायला गेला, असा तोंडावर आपटला की केली स्वत:चीच फजिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 19:25 IST2021-12-05T19:22:37+5:302021-12-05T19:25:14+5:30

एक अतिशय मजेदार असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाची चांगलीच फजिती झाली आहे.

young man doing stunt to impress young ladies falls down funny video goes viral | तरुणींना इम्प्रेस करायला स्टंट करायला गेला, असा तोंडावर आपटला की केली स्वत:चीच फजिती

तरुणींना इम्प्रेस करायला स्टंट करायला गेला, असा तोंडावर आपटला की केली स्वत:चीच फजिती

एक अतिशय मजेदार असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाची चांगलीच फजिती झाली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण स्टंटबाजी करताना दिसतोय. तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी त्याने हा घाट घातला आहे. मात्र नको ती करामत केल्यामुळे त्याचा चांगलाच अपघात झालाय.

या व्हिडीओमध्ये एक तरुण स्पोर्ट बाईकवर बसलेला दिसतोय. तो गाडीचा जोरजोरात आवाज करतोय. थोड्या वेळाने त्याच्याजवळ दोन तरुणी आलेल्या आहेत. आपल्याकडे तरुणी आल्याचे समजताच तो चांगलाच भारावलाय. त्याच्या दुचाकीवर दोन तरुणी बसल्या आहेत. विशेष म्हणजे यातील एक तरुणी त्याच्याकडे तोंड करुन बसली आहे. तर दुसऱ्या तरुणीने स्टंटबाज तरुणाला मागून पकडले आहे. नंतर गाडी जोरात चालवत तो स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र दुचाकीवर जास्त वाजन जाल्यामुळे तसेच तोल गेल्यामुळे व्हिडीओतील तरुण रस्त्यावर आदळलाय.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र तो चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी स्टंटबाज तरूणावर टीका करत आहेत. काही नेटकऱ्यांनी तर हा व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर करत अशा प्रकारचे स्टंट न करण्याचे लोकांना आवाहन केले आहे. The Darwin Awards या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पाहता येईल.

Web Title: young man doing stunt to impress young ladies falls down funny video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.