कोरोनाची लस घेताच ढसाढसा रडू लागला हा तरुण, नर्स आणि डॉक्टरने दिली अशी रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 11:54 IST2021-08-18T11:50:15+5:302021-08-18T11:54:02+5:30

सोशल मीडियावर (Social Media) लसीकरणाचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Vaccination) होत असतात. असाच आणखी एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video) सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. 

the young man crying after corona vaccination, funny video goes viral | कोरोनाची लस घेताच ढसाढसा रडू लागला हा तरुण, नर्स आणि डॉक्टरने दिली अशी रिअ‍ॅक्शन

कोरोनाची लस घेताच ढसाढसा रडू लागला हा तरुण, नर्स आणि डॉक्टरने दिली अशी रिअ‍ॅक्शन

सोशल मीडियावर (Social Media) लसीकरणाचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Vaccination) होत असतात. काही व्हिडिओ हैराण करणारे तर काही खळखळून हसवणारे असतात. असाच आणखी एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video) सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक युवक लस घेण्यासाठी आला आहे. डॉक्टरांनी त्याला लस देताच तो जोरजोरानं ओरडू लागतो. एवढा मोठा व्यक्ती अशा पद्धतीनं ओरडताना पाहून आजूबाजूचे सर्वच लोक आणि डॉक्टर हसू लागतात. हा व्यक्तीदेखील लस घेतल्यानंतर आपलं डोकं पकडून बाजूला जातो. 

सोशल मीडियावर या युवकाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. एका यूजरनं याला ओव्हर अ‍ॅक्टिंग म्हटलं आहे तर दुसऱ्या एकानं म्हटलं, की ‘इसे कहते हैं फोबिया’. हा मजेशीर व्हिडिओ फेसबुकवर Vivek Kumar नावाच्या यूजरनं शेअर केला आहे.

Web Title: the young man crying after corona vaccination, funny video goes viral