अरे ही पाठवणी की विसर्जन? नवरीचा 'हा' भन्नाट व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल, एकदा बघाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 16:41 IST2026-01-08T16:40:45+5:302026-01-08T16:41:26+5:30
Bride Funny Video : सध्या एका नवरीच्या पाठवणीचा व्हिडीओ तूफान व्हायरल झालाय. आता नवरीच्या या पाठवणीला आपण पाठवणी म्हणायचं की विसर्जन हे तुम्हीच ठरवा.

अरे ही पाठवणी की विसर्जन? नवरीचा 'हा' भन्नाट व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल, एकदा बघाच...
Bride Funny Video : लग्नातील नवरी-नवरदेवाचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पण यातील मोजकेच व्हिडीओ असे असतात जे सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतात आणि आपल्याला पोट धरून हसायला भाग पाडतात. हल्ली अनेक व्हिडीओ तर बळजबरीने तयार केलेले म्हणजे फेक असतात. पण अजूनही अनेक ओरिजनल व्हिडीओ लोकांच्या मनात घर करतात. लग्नातील कधी भांडणाचे, तर कधी गमतीजमतीचे व्हिडीओ नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. पण सध्या एका नवरीच्या पाठवणीचा व्हिडीओ तूफान व्हायरल झालाय. आता नवरीच्या या पाठवणीला आपण पाठवणी म्हणायचं की विसर्जन हे तुम्हीच ठरवा.
आपण अनेक लग्नांमध्ये नवरीची पाठवणी कशी केली जाते किंवा या वेळी वातावरण कसं असतं हे पाहिलं असेलच. पाठवणी वेळी नवरीला हुंदके देत रडतानाही आपण पाहिलं असेल. आपल्या परिवाराला सोडून जाणं हे तिच्यासाठी खूप अवघड असतं. पण जावं लागतं. हा एक खूप भावनिक असा क्षण असतो. मात्र, या व्हायरल व्हिडिओत नवरीची पाठवणी आणि ज्या पद्धतीनं ती रडताना दिसत आहे, ते बघून नक्कीच आपण पोटधरून हसाल. व्हिडिओत बघू शकता की, दोन महिलांना नवरीला चक्क उचलून धरलंय. एकीने हात धरलेत तर एकीने पाय. या स्थितीत नवरी जोरजोरात रडत नाही.
नवरीच्या पाठवणीचा हा मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर knowledgemedia07 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २४ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर या व्हिडिओच्या कॅप्शनला हिंदीत लिहिण्यात आलंय की, 'इसको विदाई कहें कि विसर्जन।' एका यूजरने यावर कमेंट केली आहे की, याला विसर्जनच म्हणा, तेच योग्य राहील. दुसऱ्या यूजरने लिहिलं की, पार्थ इथे तर धुआंधार पाठवणी होत आहे. तिसरा तर म्हणाला की, बाकी सगळं ठीक आहे, पण कॅमेरामनची हिंमत तर बघा.