तुम्ही याला अनेक मीम्स आणि फोटोत पाहिलं असेल, माहीत आहे का कोण आहे फेमस Meme Boy?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 11:22 AM2021-02-23T11:22:17+5:302021-02-23T11:39:56+5:30

Meme Star Ostia Iheme : सोशल मीडियावर ज्या मुलाचा फोटो मीममध्ये वापरला जातो त्याचं नाव आहे Ostia Iheme. तो आफ्रिकन देश नायजेरियाचा राहणारा आहे.

You must have seen this a lot in meme, gif and pictures do you know who is this famous meme boy | तुम्ही याला अनेक मीम्स आणि फोटोत पाहिलं असेल, माहीत आहे का कोण आहे फेमस Meme Boy?

तुम्ही याला अनेक मीम्स आणि फोटोत पाहिलं असेल, माहीत आहे का कोण आहे फेमस Meme Boy?

googlenewsNext

अनेकदा कमी उंचीच्या लोकांना कमी समजलं जातं. त्यांची खिल्ली उडवली जाते. पण हेही लक्षात ठेवा की, मोठा धमाका छोटासा डायनामाइटही करत असतो. त्यामुळे कमी उंचीला कधी कमी समजू नका.

Nigerian GIFs | Tenor

अशाच एका छोट्याशा शरीरात सामावलेल्या विशाल टॅलेंटच्या व्यक्तीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या व्यक्तीला तुम्ही सोशल मीडियावर अनेक मीम्स, व्हिडीओ, GIF किंवा फोटोंमध्ये पाहिलं असेल. रोज एकतरी या व्यक्तीचा फोटो तुम्ही बघत असाल. पण त्याच्याबाबत कुणाला माहीत नसणार. क्षण आनंदाचा असो वा दु:खाचा. सोशल मीडियावर याचे फोटो मीमगॅंगसाठी सर्वात भारी शस्त्र असतं. 

सोशल मीडियावर ज्या मुलाचा फोटो मीममध्ये वापरला जातो त्याचं नाव आहे Ostia Iheme. तो आफ्रिकन देश नायजेरियाचा राहणारा आहे. Osita 'नॉलिवूड' म्हणजे नायजेरियन फिल्स इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत १०० पेक्षा जासस्त नायजेरियन सिनेमात काम केलं आहे.

सोशल मीडियावर Osita ला लहान मुलगा समजणाऱ्यांना सांगतो की, तो मुलगा नाही तर त्याचं वय ३९ वर्षे आहे. पण त्याची उंची कमी आहे म्हणून त्याला सगळे लहान मुलगा समजतात. Osita चं लग्नही झालं आहे आणि त्याच्या पत्नीचं नाव Noma आहे.

सोशल मीडियावर दिसणारे Osita चे मीम्स २००३ मध्ये आलेल्या त्याच्या 'AKI NA UKWA' सिनेमातील शॉट्स आणि क्रॉप क्लिप्स आहेत. हा त्याचा डेब्यू सिनेमा होता. या सिनेमात त्याचं नाव PawPaw होतं. नायजेरियात Osita ला याच नावाने ओळखलं जातं.

Osita ला २००७ मध्ये आफ्रिक मुव्ही अवॉर्डमध्ये लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला होता. त्यासोबतच नायजेरिअन फिल्म इंडस्ट्रीमध्ये महत्वपूर्ण योगदानासाठी २०११ मध्ये त्याला राष्ट्रपती गुडलक जोनाथन द्वारे ऑर्डर ऑफ द फेडरल रिपब्लिकचा नायजेरियन ऱाष्ट्रीय सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते.

त्यासोबतच Osita ने एक मोटिवेशनल पुस्तक 'Inspired 101' हे लिहिलं आहे.  तो Inspired Movement Africa चा सदस्यही आहे. ही संस्था त्याने नायजेरियातील आणि आफ्रिकेतील तरूणांना प्रेरित करण्यातसाठी सुरू केली आहे. 

मीम बॉय कसा बनला?

Osita ला मीम बॉय बनवण्याचं श्रेय ब्राझीलच्या निकोल हिला जातं. निकोलने Osita चे सिनेमे पाहिले आणि त्याच्या अभिनयाने ती प्रभावित झाली. तिने ट्विटरवर नॉलिवूड ट्रोल नावाने एक अकाउंट तयार केलं. यानंतर Osita च्या सिनेमांचे सीन्स पोस्ट करू लागली. हळूहळू व्हिडीओजवर व्ह्यूज वाढू लागले आणि Osita सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Osita च्या मीम्सना ग्लोबल रीच तेव्हा मिळाला जेव्हा अमेरिकन पॉप स्टार रिहानाची कंपनी Fenty Beauty ने त्याचा मीम व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर प्रसिद्ध अमेरिकी रॅपर ५० सेंटने सुद्धा Osita चं मीम शेअर केलं होतं.
 

Web Title: You must have seen this a lot in meme, gif and pictures do you know who is this famous meme boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.