Worlds smallest saint : जगातल्या सगळ्यात लहान साधूंचा व्हिडीओ होतोय व्हायरल; वय ५५ वर्ष अन् उंची १८ इंच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 14:32 IST2021-03-30T14:26:44+5:302021-03-30T14:32:29+5:30
Worlds smallest saint : हे महाराज कुठेही चालू किंवा फिरू शकत नाहीत. इतकंच नाही तर त्यांना व्यवस्थित उभंसुद्धा राहता येत नाही.

Worlds smallest saint : जगातल्या सगळ्यात लहान साधूंचा व्हिडीओ होतोय व्हायरल; वय ५५ वर्ष अन् उंची १८ इंच
जगभरात नारायण नंद गिरी महाराजांची चर्चा होत आहे. हे महाराज जगातील सगळ्यात लहान साधू असल्याचं मानलं जातं. स्वामी नारायण नंद बाबांची उंची १८ इंच असून वजन १८ किलोग्राम आहे. पण आजही हे महाराज कुठेही चालू किंवा फिरू शकत नाहीत. इतकंच नाही तर त्यांना व्यवस्थित उभंसुद्धा राहता येत नाही. त्यांचे शिष्य त्यांची काळजी घेतात आणि नेहमीच त्यांच्यासोबत राहतात. सोशल मीडियावर या महाराजांचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
Narayan Nand Giri Maharaj, 55, is 18 inches tall and weighs 40 lbs. He cannot stand up or walk and is looked after by his disciple pic.twitter.com/UCnWAONM7B
— Reuters (@Reuters) March 30, 2021
हा व्हिडीओ राऊटर्स या वृत्तसंस्थेनं ३० मार्चला ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत ६४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हरिद्वारमधील आयोजित महाकुंभ २०२१ मध्ये जगभरातील लोकांसह साधू, संत पोहोचले आहेत. त्यातील एक म्हणजे स्वामी नारायण महाराज. लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. टाके मारल्यापासून छातीत दुखायचं; कंटाळून पुन्हा डॉक्टरकडे गेला अन् X-Ray रिपोर्टमध्ये दिसलं असं काही....
स्वामी नारायण नंद मध्य प्रदेशातील झांसीचे रहिवासी आहेत. कुंभ २०१० मध्ये जुन्या आखाड्यात ते सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी नागा संन्यासींची दिक्षा प्राप्त केली. दरम्यान नागा साधू बनण्याआधी त्यांचे नाव सत्यनारायण पाठक असे होते. आता त्यांना नारायण नंद महाराजांच्या नावानं ओळखलं जातं. आश्चर्य! विचित्र आजारामुळे उलटं झालंय या माणसाचं डोकं; ४४ वर्षांपासून उलटंच पाहतोय जग, पाहा फोटो