आश्चर्य! विचित्र आजारामुळे उलटं झालंय या माणसाचं डोकं; ४४ वर्षांपासून उलटंच पाहतोय जग, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 04:48 PM2021-03-28T16:48:13+5:302021-03-28T17:03:54+5:30

Trending Viral News in Marathi : असं डोकं पाहून हा मुलगा २४ तासांपेक्षा जास्तवेळ जीवंत राहू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.

जगभरातून अशा अनेक वेगवेगळ्या केसेस समोर येत असतात. ज्यात विचित्र प्रकारच्या आजारांनी लोक ग्रासलेले असतात. यातील काही आजार हे अनुवांशिक असतात. तर काही आजारांची कारणं समजणं कठीण होतं. सध्या सोशल मीडियावर ब्राझिलमधील रहिवासी असलेल्या एका माणसाची कहाणी व्हायरल होत आहे.

एका विचित्र आजारामुळे या माणसाचं डोकं ऊलटं झालं आहे. जेव्हा या माणसाचा जन्म झालेला तेव्हा जास्त दिवस जीवंत राहू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं बहोतं. पण या माणसानं इच्छाशक्तीच्या जोरावर सगळे अंदाज चुकिचे ठरवले आणि लढा दिला. आज या माणसाचं वय ४४ असून तो इतरांना प्रेरणा दिली आहे.

ब्राझिलचा रहिवीसी असलेला क्लॉडीयो वेरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ब्राझिलच्या मॉन्टे कार्लोमध्ये या माणसाचा जन्म झाला होता. क्लॉडिओ जन्माला आला तेव्हा सगळेचजण चकीत झाले कारण त्याचे संपूर्ण शरीर वाकडे तिकडे होते.

त्याचं डोकं उलट्या दिशेनं वाकलेले होतं. असं डोकं पाहून हा मुलगा २४ तासांपेक्षा जास्तवेळ जीवंत राहू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.

जन्मानंतर क्लॉडीयोला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याचवेळी त्यांच्या आईला डॉक्टरांनी सांगितले की, तुमचा मुलगा काही दिवसांचा पाहूणा आहे. पण डॉक्टरांचे म्हणणं खोटं ठरवत क्लॉडीयो आता भरभरून जीवन जगत आहे तर त्याला अकाऊंटंट बनायला आवडेल असं त्याच म्हणणं आहे.

मोटिव्हेशनल स्पिकर म्हणून क्लोडीयोची ओळख आहे. जे लोक आपल्या आयुष्यात निराश असतात. असा लोकांना त्यांच्या आयुष्यातील ताण हलका करण्यासाठी क्लोडीओ मदत करतो. सध्या तो अनेकांचे प्रेरणास्थान बनला आहे.

क्लोडीओ इतर लोकांप्रमाणेच आपलं जीवन जगत आहे. त्याला टिव्ही पाहायला मित्र मैत्रिणींसह फोनवर बोलायला खूप आवडतं.