Video: जगातला सर्वात ड्रामेबाज साप, व्यक्तीला बघताच करू लागला मृत्यूचा अभिनय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 13:46 IST2022-05-05T13:44:22+5:302022-05-05T13:46:23+5:30
Snake Drama Video: व्हायरल झालेल्या या व्हिडीओतील सापाचा अभिनय पाहून लोक अवाक् झाले आहेत. तुम्ही बघू शकता की साप कशाप्रकारे ड्रामा करत आहे.

Video: जगातला सर्वात ड्रामेबाज साप, व्यक्तीला बघताच करू लागला मृत्यूचा अभिनय
Snake Drama Video: साप बघताच भल्याभल्यांना घाम फुटतो. दुरून जरी साप दिसला तर लोक पळून जातात. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे साप असतात. त्यासोबतच सोशल मीडियावरही सापांचे कितीतरी व्हिडीओ बघायला मिळतात. सध्या सापाचा एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ जो साप दिसत आहे, त्यापेक्षा जास्त ड्रामेबाज साप तुम्ही आधी पाहिला नसेल.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओतील सापाचा अभिनय पाहून लोक अवाक् झाले आहेत. तुम्ही बघू शकता की साप कशाप्रकारे ड्रामा करत आहे. सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे साप एका व्यक्तीने स्पर्श करताच मृत झाल्याचा अभिनय करत आहे. सापाने ज्याप्रकारे अभिनय केला ते बघून तुमचा विश्वासही बसणार नाही.
तुम्ही बघू शकता की, एक खतरनाक साप वेगाने पुढे जात आहे. अशात एक व्यक्ती आल्याचं त्याला जाणवतं. सापाला जेव्हा जाणवतं की, व्यक्तीपासून त्याला धोका आहे तो थांबतो. व्यक्ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तो उलटा होऊन मेल्याचा अभिनय करू लागतो. त्यानंतर व्यक्ती सापाला हातात घेतो तरीही साप आपला अभिनय सुरूच ठेवतो.
हा ड्रामेबाज सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना खूपच आवडत आहे. व्हिडीओ earthpix नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या सापाला बघून हैराण झाले आहेत. तर काही लोक त्याच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.