५ रुपयांच्या कारणावरून कॅब ड्रायव्हरसोबत महिलेचा वाद विकोपाला; पाहा नेमंक काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 12:50 IST2023-12-12T12:49:52+5:302023-12-12T12:50:54+5:30

केवळ पाच रूपये जास्तीचे मागितल्याने एक महिला प्रवासी आणि कॅब ड्रायव्हर यांच्यामध्ये वाद उफाळून आला. 

women heated argument with cab river over 5 rs video goes viral on social media  | ५ रुपयांच्या कारणावरून कॅब ड्रायव्हरसोबत महिलेचा वाद विकोपाला; पाहा नेमंक काय घडलं?

५ रुपयांच्या कारणावरून कॅब ड्रायव्हरसोबत महिलेचा वाद विकोपाला; पाहा नेमंक काय घडलं?

Viral Video: आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा इतरत्र ठिकाणी नियोजित वेळेत पोहचण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. त्यामुळे त्या-त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपला प्रवास आरामदायी तसेच सुखकर व्हावा यासाठी अनेकजण ऑनलाईन कॅब बुकिंगला प्राधान्य देतात. बऱ्याचदा या कॅब ड्रायव्हर्समार्फत प्रवाशांची फसवणूक झाल्याचे प्रकार तुम्ही पाहिले किंवा ऐकले असतीलच. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. सोशल मीडियावर एका कॅब ड्रायव्हर आणि प्रवासी महिलेमध्ये पाच रुपयांवरून वाद झाल्याचा पाहायला मिळतोय. 

मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. त्यामुळे अनेकदा रस्ता भरकटल्याने किंवा एखाद्या ठिकाणाबद्दल पुरेपूर माहिती नसल्याने या कॅब चालकांची गफलत होते. याचा परिणाम असा होतो की प्रवाशाला चुकीच्या पत्त्यावर ड्रॉप केल्याने किंवा जास्तीचे भाडे आकारल्याने भर रस्त्यात वाद होताना दिसतात. अशाच एका कॅब ड्रायव्हरचा आडमुठेपणा दाखवणारा व्हिडीओ समोर आला आहे.

कॅब बुकिंग केल्यानंतर अ‍ॅपवर नमुद केलेल्या रकमेव्यतिरिक्त वाढीव पैसे मागितल्याने महिला प्रवासी आणि कॅब ड्रायव्हरमध्ये जोरदार भांडण झाले. प्रवासादरम्यान जेव्हा कॅब ड्रायव्हर आणि महिला प्रवासी यांच्यामध्ये वाद होतो, तेव्हा महिला प्रवाशाने काढलेला हा व्हिडीओ आहे. जास्तीचे ५ रुपये आकारल्याने या महिलेने कॅब ड्रायव्हरला जाब विचारल्यावर त्यावर हा कॅब ड्रायव्हर तावातावाने या महिलेसोबत भांडताना दिसतोय. महिलेने व्हिडीओ काढल्याचे लक्षात येताच  राग अनावर झालेला कॅब ड्रायव्हर त्या महिलेशी आणखी वाद घालतो. ही प्रवासी महिला देखील त्याच आवेशात कॅब ड्रायव्हरला प्रत्युत्तर देताना दिसत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. शिवाय नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.


येथे पाहा व्हिडीओ :

Web Title: women heated argument with cab river over 5 rs video goes viral on social media