माता न तू वैरीणी! आपल्या पोटच्या बाळाला कचऱ्यात फेकुन दिलं, सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 14:42 IST2021-09-09T14:39:43+5:302021-09-09T14:42:37+5:30

आई म्हणजे देव. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी अशी म्हण आहे. पण कधीकधी ही माता पोटच्याच मुलाची वैरीण होते. एका आईनं आपल्या पोटच्या बाळाला चक्क कचरापेटीत फेकलंय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.

woman throws her baby in dustbin garbage, shocking video goes viral on social media | माता न तू वैरीणी! आपल्या पोटच्या बाळाला कचऱ्यात फेकुन दिलं, सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद

माता न तू वैरीणी! आपल्या पोटच्या बाळाला कचऱ्यात फेकुन दिलं, सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद

आई म्हणजे देव. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी अशी म्हण आहे. पण कधीकधी ही माता पोटच्याच मुलाची वैरीण होते. एका आईनं आपल्या पोटच्या बाळाला चक्क कचरापेटीत फेकलंय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला घराच्या दरवाजाकडे जाताना दिसते. तिच्या एका हातात कचरा असतो तर दुसऱ्या हातात बाळ असतं. व्हिडिओ पाहून इतकं समजतं की महिला कचरा फेकण्यासाठी बाहेर जाते, मात्र पुढे काहीतरी उलटच पाहायला मिळतं. 

ही महिला जेव्हा घरात परत येते आणि आपल्या हातात कचरा पाहते तेव्हा ती प्रचंड घाबरते. यानंतर ती लगेचच आपल्या बाळाला घेण्यासाठी पळत जाते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर नेटकरी निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ भरपूर जुना असला तरी सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हरभजन सिंगनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यानं शिखर धवनला टॅग केलं आहे. सोबतच कॅप्शन देत लिहिलं, की शिखर धवन असं करतो.

Web Title: woman throws her baby in dustbin garbage, shocking video goes viral on social media