महिलेशी पंगा घेणं चोरांना चांगलच महागात पडलं, स्वत:वरच आली कंगाल होण्याची वेळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 19:41 IST2021-08-10T11:40:22+5:302021-08-10T19:41:26+5:30
आज की नारी, सब पर भारी! आहेच असं मुळी. महिलांना पुरुषांपेक्षा कमी समजणाऱ्यांना चपराक देणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social media) व्हायरल होत आहे. यात आपली पर्स चोरणाऱ्या महिलेनं चोरांना असा धडा शिकवला की पुन्हा ते पर्स चोरायची हिम्मत करणार नाहीत...

महिलेशी पंगा घेणं चोरांना चांगलच महागात पडलं, स्वत:वरच आली कंगाल होण्याची वेळ...
आज की नारी, सब पर भारी! आहेच असं मुळी. महिलांना पुरुषांपेक्षा कमी समजणाऱ्यांना चपराक देणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social media) व्हायरल होत आहे. यात आपली पर्स चोरणाऱ्या महिलेनं चोरांना असा धडा शिकवला की पुन्हा ते पर्स चोरायची हिम्मत करणार नाहीत...
खरंतर हा एक फनी व्हिडिओ (funny video)आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक महिला (woman) रस्त्यानं चालली आहे, इतक्यात मागून बाईकवर दोन चोर येतात आणि महिलेच्या हातातील बॅग ओढण्याचा (snatching bag) प्रयत्न करतात. मात्र, ही महिला लगेचच मागे धावते आणि आपली बॅग रस्त्यावर फेकते. यानंतर चोर ही बॅग घेण्यासाठी आपली गाडी उभी करून उतरतात व मागे पळतात, इतक्यात तरुणी तिथे उभी असलेली या तरुणांची गाडी घेऊन फरार होते. हे पाहून दोन्ही चोर हैराण होतात, ते मागे पळण्याचा प्रयत्नही करतात, मात्र तोपर्यंत ही तरुणी निघून गेलेली असते. पुढे कहर म्हणजे ते रस्त्याने पश्चाताप करक जात असताना ती बाईकवरून परत येते व त्यांच्या खांद्यावरील बॅग हिसकावून निघून जाते.
हा व्हिडिओ पाहुन नेटकरी खो-खो हसत आहेत. हा व्हिडिओ vip5abii नावाच्या यूजरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ २६ लाखहून अधिकांनी पाहिला आहे.