Video : भारीच! भूकेलेल्या मोरानं भाजीवाल्या आजीकडे घेतली धाव; अन् या आजीने 'अशी' भागवली भूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 01:49 PM2020-08-03T13:49:52+5:302020-08-03T13:50:34+5:30

नेहमी गजबजलेल्या मुंबईच्या रस्त्यांवरही मोरांचा वावर लॉकडाऊनच्या काळात दिसून आला.

Woman selling vegetables feeding a peacock twitter loved it see viral video | Video : भारीच! भूकेलेल्या मोरानं भाजीवाल्या आजीकडे घेतली धाव; अन् या आजीने 'अशी' भागवली भूक

Video : भारीच! भूकेलेल्या मोरानं भाजीवाल्या आजीकडे घेतली धाव; अन् या आजीने 'अशी' भागवली भूक

Next

काही दिवसांपासून तुम्ही सोशल मीडियावर मोराचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. कारण लॉकडाऊनमध्ये माणसं घरात बंद होती.  रस्त्यांवर शुकशकाट होता. त्यामुळे प्राणी पक्षी निसर्गाचा आनंद घेत मुक्त संचार करत होते. नेहमी गजबजलेल्या मुंबईच्या रस्त्यांवरही मोरांचा वावर  लॉकडाऊनच्या काळात दिसून आला. सध्या सोशल मीडियावर मोराचा व्हिडीओ व्हायरल  होत आहे. 

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता मोर भुकेलेल्या अवस्थेत आहे. एक भाजी विकणारी महिला मोराला खाऊ घालताना दिसून येत आहे. सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओला खूप पसंती दिली आहे. ही महिला अत्यंत प्रेमळपणे या मोराला आपल्या  हातातील दाणे खाऊ घालत आहे. रस्त्यांच्याकडेला या महिलेले आपले भाज्यांचे दुकान लावले आहे. इतक्या सगळ्या भाज्या पाहून मोराने या आजीकडे धाव घेतली आहे. त्यानंतर या महिलेने हातात काही दाणे घेतले त्यानंतर मोराच्या दिशेने हात केला आहे.

त्याच दरम्यान  रस्त्यावरून जात असलेल्या काही लोकांना हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले आहे. ज्याप्रकारे मोर त्या महिलेच्या हातातील  दाणे खात आहे ते पाहून सगळ्यांना आनंद वाटला आहे. व्हायरल झाल्यानंतरसोशल मीडिया युजर्सनी अनेकदा हा व्हिडीओ पाहिला आहे. 

टिंकू व्यंकटेश यांनी  १ ऑगस्टला आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला आतापर्यंत ४.५ लाखांपेक्षा जास्त व्हिव्हज आणि ५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर १ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ही महिला गरीब असली तरी मनानं खूप श्रीमंत आहे अशी कमेंट एका  युजरने केली आहे. 

ऐकावे ते नवलंच! ....म्हणून 'ही' डॉक्टर नेहमी बिकनी घालून करते रुग्णाचे उपचार, पाहा फोटो

कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी

Web Title: Woman selling vegetables feeding a peacock twitter loved it see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.