शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

बॉयफ्रेन्डच्या घरी ड्रेस विसरली होती तरूणी, बॉयफ्रेन्डचा आईचा कारनामा व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 2:33 PM

सोशल मीडियात एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून चांगलीच व्हायरल होत आहे. ही पोस्ट वाचून तुम्ही हैराणही व्हाल आणि सोबतच तुम्हाला जोरदार हसूही फुटेल.

सोशल मीडियात एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून चांगलीच व्हायरल होत आहे. ही पोस्ट वाचून तुम्ही हैराणही व्हाल आणि सोबतच तुम्हाला जोरदार हसूही फुटेल. हॅम्पशायरच्या २१ वर्षीय लिली हेंससोबत असं काही झालं, ज्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. 

लिली आणि तिच्या बॉयफ्रेन्डमध्ये काही दिवसांपासून सगळंकाही ठिक सुरू होतं. पण अचानक काही कारणांमुळे दोघांचे खटके उडू लागले आणि दोघांचं ब्रेकअप झालं. पण लिली तिच्या एक्स बॉयफ्रेन्डच्या घरी एक महिन्यांआधी तिचा ब्लॅक ड्रेस विसरून आली होती. आता तर दोघांमध्ये ही काही बोलणंही होत नव्हतं. 

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, लिलीचा बॉयफ्रेन्ड हा ती सोबत असतानाही दुसऱ्या एका मुलीला डेट करत होता. ज्यामुळे दोघांवर ब्रेकअपची वेळ आली. लिली आणि तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डमध्ये मजेदार वळण तेव्हा आलं जेव्हा लिलीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली.असे सांगितले जात आहे की, लिली फेसबुक सर्फिंग करत होती. अचानक तिच्या एक्स बॉयफ्रेन्डच्या आईचा फोटो तिच्या समोर आला. हा फोटो पाहून लिलीची बोबडी वळाली. एक महिन्यापूर्वी जो ड्रेस लिली एक्सच्या घरी विसरली होती, तोच ड्रेस त्याच्या एक्सच्या आईने परिधान केला होता.  

ट्विटरवर लिलीने ही घटना शेअर केली आणि ही पोस्ट आता व्हायरल होत आहे. लिलीने ट्विटरवर एक्स बॉयफ्रेन्डच्या आईचा फोटो शेअर करत लिहिले की, ब्रेकअप होण्याआधी माझा ब्लॅक ड्रेस एक्सच्या घरीच राहिला होता. आता हा ड्रेस नाइट आऊटसाठी त्याची आई वापरत आहे. 

सर्वात मजेदार बाब म्हणजे पोस्ट व्हायरल झाल्यावर लिलीची पोस्ट व्हायरल झाल्यावर या पोस्टबाबच तिच्या एक्सच्या आईला सुद्धा खबर लागली. मग लिलीच्या एक्सच्या आईने फेसबुकवर कमेंट करत लिहिले की, 'अरे ही तर मी आहे. पण मला हा ड्रेस आवडला. १९ ते २० वर्षांच्या मुलीचा ड्रेस मला फिट झाला. मी किती छान दिसत आहे. मग त्यावरही लिलीने काहीतरी कमेंट केली की, तुमच्या मुलाने ज्या मुलीला सोडलं तिचा हा ड्रेस आहे. 

सोशल मीडियात लिली आणि लिलीच्या एक्स-बॉयफ्रेन्डची आई कॅरोलीन इस्टवूड यांच्यातील या टोमणेगिरीची यूजर्स मजा घेत आहेत. कुणी ही स्टोरी गंमतीत घेत आहे तर कुणी हैराण झालंय की, मुलाच्या आईने असं का केलं?

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेViral Photosव्हायरल फोटोज्