शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
2
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
3
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
केंब्रिजमधून M. Phi, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
5
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
6
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
7
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
8
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
9
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
10
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
11
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
12
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
13
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
14
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
16
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण

8 फुटांच्या अजगराने दिला होता महिलेच्या मृतदेहाला विळखा; घरातही सापडले 140 साप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 5:10 PM

महिलेच्या मृतदेहाला साधारणतः 8 फुटांचा अजगर विळखा घालून बसला होता. एवढचं नाहीतर महिलेच्या घरात 140 इतर सापही आढळून आले.

अमेरिकेतील इंडियानामध्ये एका 36 वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला. सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे, महिलेच्या मृतदेहाला साधारणतः 8 फुटांचा अजगर विळखा घालून बसला होता. एवढचं नाहीतर महिलेच्या घरात 140 इतर सापही आढळून आले. असं सांगितलं जात आहे की, अजगर महिलेच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीचा आहे. बुधवारी आढळून आला मृतदेह 

महिलेचं नाव लॉरा हर्स्ट असं सांगितलं जात आहे. इंडियाना स्टेट पोलिसांचे प्रवक्ता सर्जेंट किम रायली यांनी सांगितलं की, 'महिला राहत असलेल्या घरात अनेक साप आढळून आले. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या काउंटी शेरिफ डॉन मुनसन यांनी लॉराचा मृतदेह बुधवारी संध्याकाळी पाहिली. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. मुनसन यांच्याकडे सापाच्या अनेक प्रजातींचं कलेक्शन आहे. लॉरानेही आपल्या अपार्टमेंटमध्ये काही साप ठेवले होते.'

ऑप्टोसी रिपोर्ट

जेव्हा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा लॉरा जमिनिवर उभी होती आणि तिच्या गळ्यात एक 8 फुटांचा अजगर विळखा घालून बसला होता. तिथे पोहोचलेल्या डॉक्टरांनी सापाचा विळखा सोडवला पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रिपोर्टमधून लॉराच्या मृत्यूचं खरं कारण उघडकीस आलं होतं. 

श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याची शंका 

सर्जेंट रायली यांनी सांगितले की, 'सुरुवातीच्या चौकशीमधून असं सिद्ध होत आहे की, लॉरावर अजगराने हल्ला केला आहे. परंतु, जोपर्यंत ऑटोप्सी रिपोर्ट येत नाही. तोपर्यंत आम्ही काहीच सांगू शकत नाही.' रायलीने हे सांगितलं की, त्या घरात 140 साप होते. ज्यापैकी 20 साप लॉराने स्वतः खरेदी केले होते. 

तेव्हा होता 13 फुट लांब साप 

एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार, काउंटी शेरिफ डॉन मुनसन साप पाळण्याचा व्यवसाय करत होते. 2001मध्ये त्यांना जवळच असणाऱ्या एका शाळेत प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं होतं. जिथे त्यांनी एका 13 फुटांच्या अजगराचं प्रदर्शन केलं होतं. मुनसन यावेळी स्थानिय काउंटी शेरिफच्या ऑफिसमध्ये डिप्टी पदावर कार्यरस आहे. त्यांनी 2001मध्ये शाळेच्या कार्यक्रमात मुलांना सांगितलं होतं की, त्यांच्या घराच्या गॅरेजमध्ये 52 साप आहेत. सध्या पोलीस चौकशी करत असून अद्याप लॉराच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाही.  

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके