Wild Animals Viral Video: फुल टू राडा! जंगली प्राण्यांनी भररस्त्यात सुरू केली फाईट अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 17:34 IST2022-07-09T17:33:57+5:302022-07-09T17:34:36+5:30
जंगली प्राणी दोन पायांवर उभं राहून एकमेकांना मारताना दिसले.

Wild Animals Viral Video: फुल टू राडा! जंगली प्राण्यांनी भररस्त्यात सुरू केली फाईट अन् मग...
Wild Animals Viral Video: जंगलात विविध प्रकारचे प्राणी राहतात. त्यापैकी काही अतिशय धोकादायक असतात तर काही शांत स्वभावाचे प्राणी मानले जातात. सिंह, वाघ, बिबट्या इत्यादी पृथ्वीवरील सर्वात भयंकर प्राण्यांमध्ये गणले जातात. तर हरीण, जंगली ससे हे शांतताप्रिय प्राणी आहेत. जरी हे प्राणी सहसा जंगलात किंवा प्राणीसंग्रहालयात दिसत असे तरी कधी-कधी ते चुकून जंगल सोडून मानवी वस्तीतही आढळतात.
तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. वन्य प्राणी माणसांच्या परिसरात येऊन गोंधळ घालतानाचे व्हिडीओ बरेचदा दिसतात. सध्या सोशल मीडियावर दोन वन्य प्राण्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते दोन प्राणी रस्त्यावर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. बहुतेक प्राणी चार पायांवर चालतात. मात्र या व्हिडिओमध्ये वन्य प्राणी दोन पायांवर उभे राहून एकमेकांशी लढताना दिसत आहेत. पाहा व्हिडीओ-
Street fight.. 😅 pic.twitter.com/QiQalPL9mT
— Buitengebieden (@buitengebieden) July 7, 2022
जंगली सशासारखे दिसणारे दोन प्राणी रस्त्यावरच भिडताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्यांच्यात बॉक्सिंगचा सामना सुरू असल्यासारखे ते भांडत आहेत. त्यांचे पाय किंवा हात विजेच्या वेगाने फिरत आहेत आणि ते एकमेकांवर पंचेस मारत आहेत. पण असं असलं तरी ते अल्पावधीतच झुंज संपवून गपचूप पळून जातात. जिथे दोन प्राणी भांडत असतात, त्याच मार्गावरून जाणाऱ्या एका कारचालकाने ही व्हिडीओ काढली आहे. ही व्हिडीओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाली आहे.