बोंबला! पत्नीनेच पतीसाठी शोधून आणल्या चक्क दोन गर्लफ्रेन्ड, कॉन्ट्रॅक्ट करत ठरवल्या 'या' गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:00 IST2026-01-21T16:59:34+5:302026-01-21T17:00:18+5:30
Virat News : महिलेने स्वत: तिच्या पतीसाठी दोन गर्लफ्रेन्ड शोधल्या. इतकंच नाही तर त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट साइन करवून घेतला. ज्यात पती कधी कुणासोबत राहणार हे ठरवण्यात आलं आहे.

बोंबला! पत्नीनेच पतीसाठी शोधून आणल्या चक्क दोन गर्लफ्रेन्ड, कॉन्ट्रॅक्ट करत ठरवल्या 'या' गोष्टी
Virat News : कोणत्याही महिलेला हेच वाटेल तिच्या पतीने तिच्यासोबत एकनिष्ठ रहावं. त्याने दुसऱ्या महिलेकडे जराही बघू नये आणि नेहमी तिलाच प्रेम द्यावं. पण परदेशातील काही महिलांना असं वाटत नाही. सध्या एका कपलची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. महिलेने स्वत: तिच्या पतीसाठी दोन गर्लफ्रेन्ड शोधल्या. इतकंच नाही तर त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट साइन करवून घेतला. ज्यात पती कधी कुणासोबत राहणार हे ठरवण्यात आलं आहे.
द सन च्या एका रिपोर्टनुसार, स्कॉट आणि ब्रेंडा यांचं १० वर्षांआधी लग्न झालं. नंतर त्यांनी त्यांचं नातं ओपन केलं. सात वर्षाआधी त्यांनी समांथा नावाच्या एका तरूणीला त्यांच्या नात्यात सहभागी करून घेतलं. त्यानंतर अयांड्रा नावाच्या महिलेची एन्ट्री झाली. ब्रेंडाने या दोन्ही तरूणींना आपल्या पतीच्या गर्लफ्रेन्ड म्हणून या नात्यात स्थान दिलं. तिने त्या दोन तरूणींसोबत एक करारही केला, ज्यानुसार स्कॉट ठरवेल की, तिन्ही महिलांना कधी झोपायचंय, कधी उठायचंय, कधी जेवायचं आणि कधी इतर कामे करायचीये. तिघींनाही या गोष्टी फॉलो करणं चांगलं वाटतं.
स्कॉट हे सगळं ठरवेल की, त्यांना कसे कपडे घालायचे आङेत आणि किती मेकअप करायचं आहे. ही फॅमिली अलिकडेच 'लव्ह डोंट जज' नावाच्या यूट्यूब शोवर सहभागी झाली. जिथे त्यांनी त्यांच्या नात्याबाबत मोकळेपणाने सांगितलं. स्कॉट म्हणाला की, त्याच्याजवळ तिघींचेही गुगल लोकेशन आहे आणि सोबतच त्यांचे मेसेज देखील आहेत. महिलांचं मत आहे की, त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याची काही काळजी नाही. कारण त्यांना ती हिरावून घेतल्याने काही फरक पडत नाही. ब्रेंडाने शोमध्ये स्पष्ट केलं की, स्कॉट तिघींसोबतही रोमान्य करतो, पण त्या तिघी एकमेकींकडे बहिणीसारख्या बघतात. त्यांना एकमेकींमध्ये काहीही इंटरेस्ट नाही. त्यामुळे त्या एकमेकींसोबत रोमान्स करत नाहीत.
सोशल मीडियावर ट्रोल या अजब फॅमिलीचं सत्य जेव्हा समोर आलं तेव्हा त्यांना सोशल मीडियावरून चांगलंच ट्रोल करण्यात आलं. पण त्यांना याने काही फरक पडत नाही. बरेच लोक म्हणाले की, या महिलांना काही आत्मसन्मान नाही. दुसरी व्यक्ती म्हणाली की, त्या मूर्खपणा करत आहेत. तर तिसऱ्याने लिहिलं की, या महिलांना बघून त्याला वाईट वाटत आहे.