शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात शेतकरी; ज्यांनी लाठ्या-काठ्यांनी मारलं, त्यांनाच भरवताहेत प्रसाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 13:56 IST

Viral News in Marathi : दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी सुद्धा पोलिस कर्मचाऱ्यांना प्रसाद वाटत आहेत. यातून त्यांच्या माणुसकीचं दर्शन घडून येत आहे.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून लोकांना पोटभर अन्न मिळावं म्हणून रात्रंदिवस कष्ट घेतो. शेतकऱ्यांना सगळ्याच गोष्टी वाटून खाण्याची सवय असते. आता दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी सुद्धा पोलिस कर्मचाऱ्यांना प्रसाद वाटत आहेत. यातून त्यांच्या माणुसकीचं दर्शन घडून येत आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामधील संघर्ष हा आता भरपूर तीव्र झालेला आपल्याला दिसत आहे. त्यामुळेच हरियाणा आणि पंजाब सीमेवर शेतकरी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते. अशा स्थितीतही शेतकरी आपलं कर्तव्य करताना दिसून येत आहेत.

वृत्तसंस्था एएनआयने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.  गुरूपर्वाच्या निमित्ताने  शेतकऱ्यांनी सगळ्यांना प्रसाद वाटताना कोणाशीही भेदभाव केलेला नाही. बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनाही शेतकऱ्यांनी प्रसाद वाटला आहे. शेतकरी कोणताही भेदभाव करत नाहीत. हे या फोटोमधून दिसून येत आहे. शेतकऱ्यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.  आई ती आईच...! सापाच्या तोंडात सापडलेल्या उंदरांच्या पिल्लाला अखेर आईनं वाचवलं, पाहा व्हिडीओ

पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार तर हरियाणात भाजपचं सरकार त्यामुळे या आंदोलनावरुन जोरदार राजकारणही सुरु आहे. त्याची झलक पंजाब हरियाणाच्या सीमेवरच्या हरियाणा ब्रीजवरच पाहायला मिळाली होती. शेतकऱ्यांना सीमेवरच रोखण्यासाठी जोरदार बंदोबस्त करण्यात आला होता. पण बॅरिकेडस बाजूला सारत, ट्रॅक्टर रॅली करत शेतकरी पुढेच चालत राहिले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावचंही बनलं. दिल्लीतल्या गुडगाव, फरिदाबाद, कर्नाल, नोएडा या सर्व सीमांवरच सरकारनं नाकेबंदी वाढवण्यात आली होती. वाह, नशिब चमकलं! भारताच्या 'या' गावात सापडलं हिऱ्याचं भांडार; अन् लोकांना कळताच.....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारFarmer strikeशेतकरी संप