आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 19:07 IST2025-09-13T19:06:46+5:302025-09-13T19:07:28+5:30

ते लोक तिला रोखण्याचा प्रयत्न करत होते. यातील एक जण ओरडून म्हणला, "जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही", तर कोणी तिला हात जोडून समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तिने कुणाचेही ऐकले नाही अन्....

What is the use of regretting now Despite trying to stop, the young woman jumped into deep water; Shocking VIDEO goes viral | आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO

आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO

सध्या सोशल मीडियावर एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एका तरुणीने धरणाच्या भिंतीवरून पाण्याच्या वेगवान प्रवाहात उडी मारल्याचे दिसत आहे. ही मुलगी जेव्हा धरणाच्या भिंतीवर उभी होती, तेव्हा घटनास्थळी असलेल्या लोकांना तिचा इरादा समजला. ते लोक तिला रोखण्याचा प्रयत्न करत होते. यातील एक जण ओरडून म्हणला, "जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही", तर कोणी तिला हात जोडून समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तिने कुणाचेही ऐकले नाही आणि पाण्याच्या प्रवाहात उडी घेऊन वाहून गेली.

रोखण्याचा प्रयत्न करूनही तिने पाण्यात उडी घेतली -
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, संबंधित मुलीने प्रवाहात उडी घेताच, घटनास्थळी गोंधळ उडाला. जवळ असलेले लोक लगेच तिला वाचवण्यासाठी धाव घेतात. काही लोक तिला वाचवण्यासाठी दोरी फेकतात. तर काही पोहणारे पाण्यात उडी मारून मुलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नदीचा प्रवाह एवढा वेगवान असतो की, त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. व्हिडिओ संपेपर्यंत लोक मुलीला वाचवू शकत नाहीत. यानंतर, नेमके काय घडले? हे समजू शकलेले नाही.

थरकाप उडवणारे दृष्य -
हे भयावह दृष्य थरकाप उडवणारे आहे. कितीही विपरित परिस्थिती आली, तरी जीव देणे, हा कधीही उपाय असू शकत नाही, असे लोक म्हणत आहेत. तसेच, जीवन अमुल्य आहे, कितीही कठीन परिस्थिती आली, तरीही तिचा सामना करणे हेच खरे धैर्य आहे, असेही सोशल मीडिया युजर्स बोलत आहेत.

हा व्हिडिओ @Abhimanyu1305 नावाच्या एक्स अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. तो आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला असून अनेकांनी लाईक केला आहे. याशिवाय, या व्हिडिओवर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: What is the use of regretting now Despite trying to stop, the young woman jumped into deep water; Shocking VIDEO goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.