रेल्वेच्या डब्यावर H1 असा बोर्ड का लावलेला असतो? पाहा नेमका काय होतो याचा अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:49 IST2026-01-01T12:48:46+5:302026-01-01T12:49:47+5:30
Railway Interesting Facts: आपण पाहिलं असेल की, रेल्वेच्या कोचवर H1 लिहिलेलं बोर्ड लावलं जातं. चला तर पाहुयात याचा नेमका अर्थ काय होतो.

रेल्वेच्या डब्यावर H1 असा बोर्ड का लावलेला असतो? पाहा नेमका काय होतो याचा अर्थ
Railway Interesting Facts: भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुविधेसाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असते. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल आणि यादरम्यान पाहिलं असेल की, रेल्वेच्या डब्यांवर वेगवेगळी चिन्हे, नंबर दिलेले असतात. ज्यांमधून प्रवाशांना आवश्यक ती माहिती मिळते. पण अनेकदा असंही होतं की, काही चिन्हे किंवा कोड नंबर बघून लोक कन्फ्यूज होतात किंवा या चिन्हांचा अर्थ माहीत नसतो. ज्यामुळे अनेकदा घोळ होतो आणि चुकीच्या डब्यांमध्ये बसलं जातं. आज आम्ही रेल्वेच्या अशाच एका वेगळ्या साईन बोर्डबाबत माहिती देणार आहोत. आपण पाहिलं असेल की, रेल्वेच्या कोचवर H1 लिहिलेलं बोर्ड लावलं जातं. चला तर पाहुयात याचा नेमका अर्थ काय होतो.
गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. काही तक्रार करण्यासाठी पोर्टल, ई-तिकीटिंग, काही रेल्वेंमध्ये जेवण आणि सुरक्षेबाबत अनेक कामे केली गेली. त्याशिवाय कॅशलेस सुविधा, फ्री बेडरोल अशाही सुविधा देण्यात येतात. त्याचप्रमाणे रेल्वेवर वेगवेगळे साईन बोर्ड सुरक्षा आणि लोकांच्या सोयीसाठी लावले जातात.
कोचवर H1 चा बोर्ड लावण्याचं कारण
आपण अनेकदा H1 साईन असलेला बोर्ड बघितला असेलच. हा बोर्ड यासाठी लावला जातो कारण प्रवाशाला कळावं की, हा कोच किंवा डबा एसी फर्स्ट क्लास (AC First Class) चा आहे. ही भारतीय रेल्वेची सगळ्यात प्रीमिअम आणि महागडी श्रेणी असते. यात प्रवाशाला खाजगी कॅबिन आणि चांगल्या सुविधा दिल्या जातात. H अक्षर 'First Class' ला दर्शवतं आणि '1' ही त्या कोचची क्रम संख्या आहे.
त्यामुळे आता आपण पुढच्या वेळी रेल्वेने प्रवास करा आणि आपल्याला H1 चा बोर्ड दिसला तर समजून घ्या, हा कोच प्रीमियम आणि महागड्या श्रेणीचा आहे. जर आपल्याकडे या कोचचा तिकीट नसेल आणि या कोचमध्ये चढाल तर आपल्याला दंड भरावा लागू शकतो.