यूनिक वेडिंग फोटोसाठी यांनी जे केलं पाहून व्हाल थक्क, व्हिडीओ झाला व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 13:27 IST2018-10-29T13:26:06+5:302018-10-29T13:27:35+5:30

आजकाल वेडिंग फोटोग्राफीची एक वेगळीच क्रेझ बघायला मिळत आहे. नवरी-नवरदेव आपले चांगले फोटो येण्यासाठी आणि फोटोग्राफर त्यांचे फोटो घेण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही.

Wedding photography to make this unique and they set their gown on fire watch videos | यूनिक वेडिंग फोटोसाठी यांनी जे केलं पाहून व्हाल थक्क, व्हिडीओ झाला व्हायरल!

यूनिक वेडिंग फोटोसाठी यांनी जे केलं पाहून व्हाल थक्क, व्हिडीओ झाला व्हायरल!

(Image Credit : Facebook)

आजकाल वेडिंग फोटोग्राफीची एक वेगळीच क्रेझ बघायला मिळत आहे. नवरी-नवरदेव आपले चांगले फोटो येण्यासाठी आणि फोटोग्राफर त्यांचे फोटो घेण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. यूनिक फोटोच्या नादात काही लोक आपल्या जीवाशीही खेळू लागले आहेत. याचच एक उदाहरण समोर आलं आहे. 

या जोडीने कपल फोटोशूट दरम्यान आपल्या गाऊनमध्ये आग लावली आणि त्यात स्थितीत फोटोशूट केलं. हे फोटो आणि याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. एप्रिल कोई आणि बेथने दोघीही कलाकार आहेत. त्यांनी अनेक स्टंट केले आहेत. त्यांनी त्यांच्या लग्नासाठी काही असेल स्टंट करण्याचा प्लॅन केला. 

दोघींनी यावेळी कॉटनचा ड्रेस परिधान केला होता. यात खासियत ही होती की, आगीपासून पायांचा बचाव केला जात होता. हे फोटोशूट अंधारा केलं गेलं. त्यामुळे आगीच्या प्रकाशात हा फोटो आणखीन चांगला आला. पण त्या दोघी स्टंट आर्टीस्ट असल्याने पूर्ण काळजीसोबत त्यांनी हे केलं. 

यातील एका मुलीने सांगितले की, दोघींचे आई-वडील याबाबत चिंता करत होते. फोटोग्राफर त्यांच्यापासून १० फूटाच्या अंतरावर उभा होता. हा फोटोवर आणि व्हिडीओवर सध्या काही चांगल्या तर काही नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. 

Web Title: Wedding photography to make this unique and they set their gown on fire watch videos