VIDEO : स्टेजवर बसले होते नवरी-नवरदेव, मित्रांनी केली अशी गंमत की नवरी लाजली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 18:31 IST2021-07-22T18:24:42+5:302021-07-22T18:31:05+5:30
सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Social Viral Video) झाला आहे. नवरी-नवरदेवासोबत मित्रांच्या गॅंगने अशी गंमत (Funny Video) केली ज्याचा त्यांनी विचारही केला नसेल.

VIDEO : स्टेजवर बसले होते नवरी-नवरदेव, मित्रांनी केली अशी गंमत की नवरी लाजली!
लग्नात जेव्हा नवरी-नवरदेव स्टेजवर बसलेले असतात तेव्हा मित्रांमध्ये काहीतरी गंमत करण्याची इच्छा होतेच होते. अनेकदा बघायला मिळतं की, जेव्हा लग्नात नवरी-नवरदेव स़्टेजवर (Marriage Viral Video) बसलेले असतात तेव्हा काहीना काही प्रॅंक केलं जातं. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Social Viral Video) झाला आहे. नवरी-नवरदेवासोबत मित्रांच्या गॅंगने अशी गंमत (Funny Video) केली ज्याचा त्यांनी विचारही केला नसेल.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की स्टेजवर नवं जोडपं बसलेलं आहे. अचानक त्यांचे मित्र-चुलत बहिणी एक एक करून येतात. ते येतात आणि नवरी नवरदेवाच्या हातात एक एक रूपया देऊन जातात. इतकंच नाही तर ते दोघांच्याही पाया पडतात. साधारण सहा ते सात लोक एकपाठी एक येऊन ही गंमत करतात. (हे पण बघा : अरे देवा! नवरदेवाच्या मित्रांनी दिलं असं गिफ्ट, रागाने नवरीचा चेहरा झाला लाल; बघा व्हिडीओ)
आपल्या मित्रांची आणि भावांच्या गंमतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हार्दिक भट्ट नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. स्टेजवर बसलेली सुंदर नवरी हे बघून हसायला सुरूवात करते. तिथे उपस्थित लोकही हसू लागतात.. या व्हिडीओ आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत तर कोट्यावधी व्ह्यूज मिळाले आहेत.